@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ maharashtra vidhansabha election results update] : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर झाला आहे , या निवडणुकीमध्ये काही दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे , अशा उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे जाणून घेऊया ..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण यांचा दक्षिण कराड मतदार संघातून पराभव झाला आहे . सदर मतदार संघात भाजपाची उमेदवार अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा 39, 355 मतांनी पराभव केला आहे .
बच्चू कडू : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे अचलपूर मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आले होते , परंतु यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा 12,131 मताने पराभव झाला आहे . तर सदर मतदारसंघात भाजपचे प्रवीण तोयडे हे विजयी झाले आहेत .
यशोमती ठाकरे : यशोमती ठाकरे ह्या काँग्रेस पक्षाकडून सलग तीन वेळा निवडून आल्या होत्या , परंतु यंदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला आहे .
बाळासाहेब थोरात : काँग्रेसचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा पराभव झाला आहे , यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे . बाळासाहेब थोरात हे संगमनेर मतदारसंघातून , शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांनी पराभव केला आहे .
धीरज देशमुख : लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवार तथा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा धीरज देशमुख यांचा पराभव भाजपचे उमेदवार रमेश कराड यांनी केला आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !