@marathiprasar प्रतिनिधी [ Maharashtra vidhansabha election 2024 ] : महाराष्ट्र राज्याचे विधानसभा निवडणुका 2024 येत्या नोव्हेंबर -डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहेत , तर त्या अनुषंगाने राज्यांमध्ये राजकीय वातावरण तयार होत असल्याचे दिसून येत आहेत . एका बाजुने मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणांसाठी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहेत .
तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे उपोषणास बसले होते , सदरच्या उपोषणाला राज्य सरकारचे शिष्टमंडळांनी भेट देवून मागण्या मान्य करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याने , सदरचे ओबीसी आरक्षण बचाव उपोषणांस उपोषण कर्ते लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी नवनाथ वाघमोर यांनी स्थिगिती दिली आहे .
येत्या विधानसभा निवडूकांमध्ये आरक्षणांचा मुद्दा अधिकच गाजणार असल्याचे दिसून येत आहेत , कारण मराठा आरक्षणांच्या मुद्द्यावरच बीड लोकसभा मतदारसंघातुन बजरंग सोनवणे यांना मनोज जरांगे पाटलांनी पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय झाल्याचे मिडीयामध्ये मोठी चर्चा आहे . तर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मनोज जरांगे पाटील अधिकच सक्रिय होणार असल्याचे दिसून येत आहेत .
शिवाय मनोज जरांगे पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार उभा करु शकतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत , लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवार गटांस मनोज जरांगे पाटीलांनी मदत केल्याने , ते महाविकास आघाडी पक्षासोबत युती करुन आपले उमेदवार उभा करु शकतील असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत .
पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर ओबीसी आरक्षण बचाव मोहीमेत अधिक सक्रिय झाल्या आहेत .यामुळे पंकजा मुंडे या परत विधानसभेला तयारीत लागल्याचे मिडीयामध्ये चर्चा सुरु आहेत . यंदाच्या विधानसभेच्या निवडणुका मध्ये मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण बचाव या मुद्दा अधिकच गाजणार असल्याचे दिसून येत आहेत .
शिवाय राज्यातील लोकसभा निवडणुकांचा निकाल पाहता , विधानसभेत देखिल उद्धव ठाकरे गट , शरद पवार गटांस अधिक जागा मिळण्याच्या शक्यता वर्तविल्या जात आहेत .
-
राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ State employees get 10 days paid leave for this work every 3 years; Know the government decision of the Finance Department ] : राज्य कर्मचाऱ्यांना वर्षातुन 10 दिवस खाली नमुद करण्यात आलेल्या प्रयोजनासाठी पगारी रजा अनुज्ञेय करण्यात येते . याबाबत वित्त विभागा मार्फत निर्गमित सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे…
-
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important Gazette issued for Zilla Parishad employees on 18.07.2025 ] : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांकरीता ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 18 जुलै 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकानुसार , नमुद करण्यात आलेले आहेत कि , महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा…
-
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Modi government’s important decision regarding leave for government employees; Information given in Parliament. ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 30 दिवसांची भरपगारी रजा मिळणार आहे . सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजे संदर्भात संसदेत प्रश्न विचाराण्यात आलेला होता…