@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ maharashtra state photo , reels , short film computation ] : राज्य शासनाकडून राज्याचे प्रगतीचे दृकश्राव्य माध्यमातून दर्शन घडावे , याकरिता राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क मंत्रालयाकडून राज्याच्या ऐतिहासिक वारसा , प्राचीन तसेच सरकारच्या विविध महत्त्वाकांशी योजनांवर आधारित छायाचित्र, लघुपट , रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये महाराष्ट्र माझा या संकल्पनेवर आधारित राज्याचे सांस्कृतिक, सामाजिक ,शैक्षणिक, कृषी तसेच जलसंपदा जल,पायाभूत सुविधा ,पर्यटन, आरोग्य त्याचबरोबर पर्यावरण, वने इत्यादी योजनांची संबंधित छायाचित्रे लघुपट स्पर्धेसाठी पाठवता येतील .
सदर स्पर्धेमध्ये प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहे , यामध्ये अनुक्रमे प्रथम येणाऱ्यास 25000/- रुपये , द्वितीय येणाऱ्यास वीस हजार तर तृतीय येणाऱ्यास पंधरा हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान केले जाणार आहेत. तर तीन हजार रुपयांची 15 उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत . या स्पर्धेमध्ये प्राप्त होणाऱ्या छायाचित्रांपैकी दर्जेदार असणाऱ्या छायाचित्रांची मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणामध्ये त्याचबरोबर राज्यामध्ये प्रदर्शन भरवण्यात येणार आहे .
त्याचबरोबर लघुपट वरील यांना शासनाच्या समाज माध्यमावरून प्रसिद्धी देण्यात येईल , तर राज्यातून प्राप्त होणाऱ्या छायाचित्रांची प्रदर्शनाकरिता निवड करण्याकरिता तज्ञांची समिती गठित करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे .
छायाचित्र स्पर्धेचे नियमावली : आपणास छायाचित्र स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास छायाचित्राचे आकार 18X30 इंच आकारात त्याच बरोबर छायाचित्राची थीम माहिती व जनसंपर्क महासंचालयाने सूचित केल्याप्रमाणे थीम सुसंगत असावी , तसेच कोणत्याही अनुचित दृश्य नसावेत , त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे कॉपीराईट वापरली जाऊ नयेत, त्याचबरोबर छायाचित्राचे तपशीलवार वर्णन करणे अपेक्षित असणार आहेत , तसेच स्पर्धेत भाग घेतल्यानंतर छायाचित्रांचे स्वामित्व अधिकार राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क मंत्रालयाकडे असणार असल्याचे नमूद करण्यात आले आहेत .
रिल्स स्पर्धेचे नियमावली : रील स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यानंतर मर्यादा ही एक मिनिटापर्यंत असावी , तसेच सदर रिल्समध्ये आक्षेपार्थ शब्द तसेच असभ्य भाषा यांचा वापर करता येणार नाहीत , त्याचबरोबर कोणत्याही कॉपीराईट नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आली आहेत. तसेच सदर स्पर्धा वय वर्ष 18 वर्षे व त्यावरील सर्वांसाठी खुली असणार आहे, सदर रिल्स मानक स्वरूपात अपेक्षित आहे .
सदरची रिल्स ही नवीन असून विशेष करून स्पर्धेकरिता तयार केली जावी असे नमूद करण्यात आली आहे , सदर स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यानंतर सदर रील चे स्वामित्व माहिती व जनसंपर्क महासंचालनाकडे असतील .
लघुपट स्पर्धेची नियमावली : लघुपट तयार करताना किमान तीन मिनिटे तर कमाल पाच मिनिटे इतक्या कालावधीतील लघुपट असावा , सदर स्पर्धेमध्ये वय वर्ष 18 वर्षावरील कोणताही नागरिक सदर स्पर्धेत सहभाग घेऊ शकतो. सदर लघुपटामध्ये अभद्र भाषा , आक्षेपार्थ शब्द , हिंसा होणार नसल्याचे काळजी घेण्याची निर्देश देण्यात आले आहे . तसेच कोणत्याही प्रकारचे कॉपीराईट नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आली आहे . सदर मानक व्हिडिओ हे MP 4 HD 1920* 1080 स्वरूपात असावेत .
स्पर्धेत सहभागी कसे व्हावे : वरील तीनही सामग्री dgiprdlo@gmail.com या ईमेलवर दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत आपले संपूर्ण नाव , मोबाईल नंबर , संपूर्ण पत्ता व त्यासोबत सदर छायाचित्र लघुपट रिल्स पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहे .
-
राज्य कर्मचाऱ्यांना देय व अनुज्ञेय रजेची वैशिष्ट्ये – अर्जित रजा ( नियम 50 ) ; जाणून घ्या सविस्तर !

leave rules
-
सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगातील शेवटचे तीन महागाई भत्ता वाढ ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the loveMarathiprasar प्रज्ञा पवार प्रतिनिधी [ Government employees to get last three dearness allowance hikes in 7th Pay Commission ] : दर दहा वर्षांनी नविन वेतन लागु करण्यात येत असतो , जसे कि सन 2016 पासुन सध्या सातवा वेतन आयोग लागु आहे . सदर सातवा वेतन आयोगाची मुदत ही दि.31.12.2025 रोजी संपणार आहे .…
-
मोदी सरकार मार्फत सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना दोन मोठे गिफ्ट ; जाणुन घ्या सविस्तर ..

Spread the loveMarathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Two big gifts for government employees/pensioners through Modi government ] : केंद्र सरकार मार्फत सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांसाठी दोन मोठे गिफ्ट मिळणार आहे . 01.नविन वेतन आयोग : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत समितीचे गठण करण्यात आलेले असून , पुढील 18 महिन्यांत आपला…