@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपल्याकडे पिवळा किंवा केशरी रेशनकार्ड असल्यास , आपल्या कुटुंबामध्ये मुलींचा जन्म झाला असल्यास आपणांस तब्बल 1 लाख रुपये इतरकी रक्कम मिळणार आहे , या करीता असणारी पात्रता , आवेदन प्रक्रिया या संदर्भातील सविस्तर लेक लाडकी योजना बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
लेक लाडकी योजना : लेक लाडकी ही योजना राज्य सरकार मार्फत राबविण्यात येते , मुलींच्या जन्मानंतर मुलींच्या शिक्षण व विवाहाच्या खर्च करीता मुलींच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य करणे या उद्देशाने या योजनांची सुरुवात करण्यात आलेली आहे , ही योजना एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय , नवी मुंबई मार्फत राबविण्यात येते .
लेक लाडकी योजना पात्रता : या योजनाचा लाभ घेण्याकरीता मुलगी ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक असणार आहे . तसेच मुलीच्या कुटुंबाचे रेशनकार्ड हे पिवळ्या / केशरी रंगाचे असणे आवश्यक असेल . तसेच सदर लाभार्थी हा गरीब व मागासवर्गीय असणे आवश्यक असेल . मुलींचे पालक हे करपात्र अथवा त्यांच्या कडे मोठी वाहने ( कार / ट्रॅक्टर / मोठे घर ) असल्यास सदर कुटुंबिय अपात्र ठरेल . कुटुंबियाचे वार्षिक उत्पन्न हे 100,000/- रुपये पेक्षा जास्त असू नयेत . दुसरे अपत्य झाल्याच्या नंतर आई / वडील यापैकी एकाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक असेल .
लेक लाडकी योजना अंतर्गत मिळणारे आर्थिक लाभ : या योजना अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर मुलीच्या आईच्या खाती 5000/- रुपये ऐवढी रक्कम मिळेल , त्यानंतर मुलीच्या इयत्ता 1 ली मधील प्रवेशानंतर 6000/- रुपये , इयत्ता 6 वी मध्ये 7000/- रुपये तर मुलीच्या इयत्ता 11 वी मधील प्रवेशानंतर 8000/- रुपये तर मुलीच्या वयाच्या 18 वर्ष पुर्ण झाल्याच्या नंतर एकुण रुपये 75,000/- एवढी रक्कम मिळेल , सदर योजना अंतर्गत एकुण रक्कम 1 लाख 1 हजार रुपये ऐवढी रक्कम मिळेल .
आवेदन कसा कराल : या योजना अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अंगणवाडी सेविका यांच्या कडे आवेदन सादर करावा लागेल .या संदर्भातील राज्य शासनांकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर GR पाहण्यासाठी