राज्यातील “या” 20 जिल्ह्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा “रेड अलर्ट” ; जाणून घ्या सविस्तर अपडेट !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : राज्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे , राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये तापमान 40 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक झाला आहे . यामुळे वातावरणामध्ये मोठे बदल घडून येत आहेत , बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले असल्याने , अवकाळी गारपीट पावसाचे प्रमाण विदर्भ , मराठवाड्यामध्ये अधिक दिसून येत आहेत .

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील 20 जिल्ह्यांना परत एकदा रेड अलर्ट देण्यात आला आहे , राज्यात येत्या 23 एप्रिल पर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची मोठी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे . राज्यातील विदर्भ, मराठवाडा त्याचबरोबर पुण्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाची मोठी शक्यता वर्तवण्यात आली आहे .

यामध्ये विदर्भ, मराठवाडा त्याचबरोबर खानदेश तसेच पुणे विभागातील जिल्हे अशा 20 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह दिनांक 23 एप्रिल पर्यंत पावसाची मोठी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे . सध्या विदर्भ , मराठवाडा जिल्ह्यातील तापमान 42 अंश सेल्सिअस ते 44 अंश सेल्सिअस दरम्यान आहे . यामुळे या भागामध्ये उष्णतेची मोठी लाट पसरली आहे , तर देशामध्ये हरियाणा ,पंजाब ,उत्तराखंड या राज्यामध्ये गारपिटाचा पाऊस झाला आहे यामुळे तेथील गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे .

राज्यामध्ये येत्या 23 एप्रिल पर्यंत वरील नमूद 20 जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. उन्हाळा ऋतूतील पाऊस  हानिकारक अधिक ठरतो , कारण या कालावधीमध्ये पिकांची मोठे नुकसान होत असते ,सध्या भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होताना दिसून येत आहेत.

यंदाच्या वर्षी मान्सून एक 08 जून रोजी भारतामध्ये हजेरी लावणार आहे , तर यंदाच्या वर्षी जुलै ,ऑगस्ट ,सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment