@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : सध्या इस्त्राईल व इराणचे युद्ध सुरु झाले आहे , यांमध्ये इराण कडून आक्रमण भुमिका पाहायला मिळते . दिनांक 14 एप्रिल 2024 वार रविवार रोजी इराणने इस्त्राईलवर तब्बल 300 क्षेपणास्त्र डागले होते , या क्षेपणास्त्राला इस्त्राकडून करारी जवाब देण्यात आले , हे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात आल्याने कोणत्याही प्रकारची हानी यांमध्ये झाली नाही .
आता जागतिक पातळीवर रशिया – युक्रेन नंतर इस्त्राईल – इराणची लढत सुरु झाली आहे , यामुळे आता यांमध्ये इतर देशांनी हस्तक्षेप केल्यास निश्चितच तिसरे विश्वयुद्ध होण्याची मोठी शक्यता आहे . यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणत्या प्रकारचे विपरीत परीणाम होतील याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
पेट्रोल -डिझेल इंधनाच्या किंमती वाढतील ? इराण देशाकडून कच्चा तेलाची आयात कमी असली तरी , युद्धामुळे इतर कच्चा तेलाची तुटवडा कमी होईल , याचा परिणाम रशिया कडून काही देशांनी बंदी घालण्यात आलेली उठविण्यात येईल . रशिया -युक्रेन युद्धामुळे रशियाकडून कच्चा तेलाची खरेदी करण्यास काही युरोपिय देशांनी बंदी घातली होती , याचा फायदा भारताला झाला आहे , कारण रशियाकडून भारताला इतर देशांनी बंदी घातल्याने , मोठ्या सवलतीमध्ये कच्चे तेल मिळत आहे .
तर आता इराणच्या कच्चा तेलाची खरेदी करण्यास बंदी येवू शकते , कारण इराणने युद्ध सुरु करुन कायद्याचे उल्लंघन केले आहे . याचा परिणाम जागतिक पातळीवर कच्चे तेलाचे भाव अधिकच वाढणार आहेत . आणखीण युद्धाचा भडका उडाल्यास , निश्चितच पेट्रोल , डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढतील .
जागतिक पातळीवर तीन देशांचे युद्ध सुरु असल्याने , बऱ्याच देशातील मध्यवर्ती बँकाकडून सोन्याची खरेदी करण्यात येत आहे , परिणामी सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होत आहे . युद्धामुळे सोन्याचे भाव हे 80,000/-रुपयांचा आकडा पार करेल .
युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताने इस्त्राईल सोबत व्यापाराही अधिक चालना दिली आहे , तर इराण सोबत व्यापार कमी करण्यात आला आहे . कारण भारत – इस्त्राईल यांच्यातील व्यापारी इतर कृषी संबंधि अधिक घनिष्ठ आहे . यामुळेच भारताने इस्त्राईलसोबत संबंध अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही देशातील व्यापारास चालना देण्यात येत आहे .