महाराष्ट्र पोलिस भरती बाबत आत्ताची मोठी अपडेट ; गृह विभागांकडून महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !

Spread the love

@marathiprasar पुजा पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पोलिस भरती बाबत आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहेत , गृह विभागांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी मुदतवाढ देणेबाबत , अधिकृत्त परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .

महाराष्ट्र राज्य पोलिस महाभरती करीता करीता ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती , आता ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यास दिनांक 15 एप्रिल 2024 पर्यंत मुदत मिळणार आहे . सदर मुदतवाढीचे कारणे पुढीलप्रमाणे पाहता येईल .

राज्य शासनांकडून मराठा समाजाला SEBC मधून नुकतेच आरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे , परंतु सदर मराठा समाजातील उमेदवारांना SEBC संवर्गातीलचे जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईन विलंब होत असल्याने , सदर उमेदवारांना विहीत मुदतीमध्ये आवेदन सादर करता यावेत , याकरीता दिनांक 15 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनांच्या गृह विभागांकडून घेण्यात आलेला आहे .

सध्या गृह विभागांकडून महाराष्ट्र पोलिस शिपाई , कारागृह पोलिस शिपाई , पोलिस बॅन्डसमन , सशस्त्र पोलिस शिपाई पदांच्या तब्बल 17 हजार जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आता दिनांक 15 एप्रिल पर्यंत ज्या उमेदवारांचे जातीचे दाखले निघण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी आवेदन सादर केल्याच्या पोचपावतींसह अर्ज सादर करण्याची मुफा देण्यात आलेली आहे , परंतु कागतपत्रे पडताळणीवेळी उमेदवारांकडे सर्व कागदपत्रे विहीत नमुन्यात असणे आवश्यक असणार आहेत .

ऑनलाईन पध्दतीने आवेदन सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत..

CLICK HERE

Leave a Comment