@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : व्हाट्सअप ही कंपनी ऑनलाइन नेटवर्किंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे , ज्या माध्यमातून आपण एकमेकांना संदेश , व्हिडिओ कॉलिंग , व्हॉइस कॉलिंग , फोटो , व्हिडिओ यांचे देवाणघेवाण करू शकतो . जगामध्ये या ॲपचा वापर सर्वाधिक केला जातो, या कंपनीने नुकतेच आपल्या एसएमएस चार्जेस मध्ये वाढ केली आहे , आता प्रति एसएमएस 2.3/- रुपये इतके वाढ लागू करण्यात आलेली आहे .
व्हाट्सअप ही कंपनी मेटा कंपनीने विकत घेतली असून , या कंपनीने प्रति एसएमएस 2.3 रुपये चार्जेस आकारणार असल्याचे नुकतेच मोठा निर्णय घेण्यात आला आहे . मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय वन टाइम पासवर्ड याची नवीन श्रेणी सादर झाली आहे . ज्यामुळे आता भारतामध्ये व्यावसायिक संदेश पाठवण्याचा खर्च अधिकच वाढणार आहे , ज्यामुळे व्हाट्सअप कंपनीस सर्वाधिक फायदा होणार आहे .
यामध्ये आंतरराष्ट्रीय मेसेज कॅटेगिरी मध्ये प्रति मेसेज 2.3/- रुपये इतके चार्जेस माहे जून महिन्यापासून आकारले जाणार आहेत . हे दर व्यवसायिक कॅटेगिरी मधील एसएमएस करिता लागू असणार आहेत . या अगोदर याचे दर 0.11 पैसे इतके होते , तर इतर स्थानिक दूरसंचार कंपनीकडून प्रति एसएमएस 0.12 पैसे इतके आकारले जात होते .
याचा मोठा परिणाम भारत आणि इंडोनेशिया या दोन्ही देशाच्या व्यवसायावर होणार आहे . कारण भारत आणि इंडोनेशिया या दोन्ही देशांमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय व्यवसाय होतो , हे दर सामान्य व्हाट्सअप वापर कर्ते यांच्यासाठी पूर्वीप्रमाणे मोफत असणार आहेत . त्याकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाहीत हे दर व्यवसायिक मेसेजेस करीतच आकारले जाणार आहेत .
या निर्णयामुळे भारतातील इतर दूरसंचार कंपन्यांना फायदा होणार आहे कारण यापूर्वी व्हाट्सअपचे SMS चे दर कमी असल्याने , इतर दूरसंचार कंपन्यांना परवडत नव्हते, व्हाट्सअप चे या निर्णयामुळे इतर कंपन्यांना आता फायदा होणार आहे .