लोकसभा निवडणुकांमुळे , महाराष्ट्र पोलिस भरती प्रक्रिया लांबणीवर जाणार  !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी :  राज्यात लोकसभेच्या निवडणुका 05 टप्यात होणार आहेत , निवडणुकीचा पहिला टप्पा हा दिनांक 19 एप्रिल पासून सुरुवात होत असून , निवडणुकीचा शेवटचा टप्पा ( 5 वा टप्पा ) 20 मे पर्यंत होणार आहेत . या प्रक्रियेमुळे राज्यातील पोलिस महाभरती प्रक्रिया लांबणी जाणार आहे .

तर देशांमध्ये मतदानाचा शेवटचा टप्पा हा 15 जुन पर्यंत संपन्न होणार आहे , तर राज्यात 15 जून पर्यंत निकाल लागणार आहे .या मतदान निवडणुक प्रक्रियेमुळे राज्यातील पोलिस महाभरती प्रक्रियेस 20 जुन नंतर मुहुर्त लागणार आहे .महाराष्ट्र गृह विभागांमध्ये 17 हजार पोलिस शिपाई , चालक , कारागृह पोलिस शिपाई , सशस्त्र पोलिस शिपाई पदांकरीता महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 30 मार्च पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे .

या निवडणुकांमुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना तयारीसाठी तब्बल 3 महिन्यांचा अवधी  मिळणार आहे . यांमध्ये 50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहेत , तर शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या रिक्त जागेच्या 1:10 उमेदवारांना लेखीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहेत . तर अंतिम निवड चाचणी तयार करताना लेखी व शारीरिक चाचणीचे गुणांचा विचार करण्यात येईल .

शारीरिक चाचणीचे प्रकार व गुण  : शारीरिक चाचणींमध्ये गोळा फेक 15 गुण , 100 मीटर धावणे 15 गुण तर 1600 मीटर ( पुरुष उमेदवारांकरीता ) 20 गुण / महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण असे एकुण  50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल .

लेखी परीक्षेतील विषय : लेखी परिक्षेत एकुण 100 गुणांची प्रश्न विचारले जातील , यांमध्ये मराठी व्याकरण 25 गुण , अंकगणित 25 गुण , बुद्धिमत्ता 25 गुण , तर सामान्य ज्ञान 25 गुण अशा चार विषयांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल .

Leave a Comment