@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य गृह दलांमध्ये कार्यरत पोलिस शिपाई या पदाकरीता सातव्या वेतन आयोगानुसार किती पगार मिळतो ,इतर कोणकोणते भत्ते / वेतन अनुज्ञेय होतात , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
7 व्या वेतन आयोगानुसार , राज्य शासनाच्या गृह विभागातील कार्यरत पोलिस शिपाई , चालक , कारागृह पोलिस शिपाई , सशस्त्र पोलिस शिपाई या पदांस S7 : या वेतनश्रेणीत 21700-69100/- वेतन मिळते , या व्यतिरिक्त महागाई भत्ता , घरभाडे भत्ता , वाहतुक भत्ता , भरपाई , ओव्हरटाईम भत्ता अशा प्रकारचे भत्ते अनुज्ञेय होतात , सदर भत्ते मिळून एकुण किती पगार होतो , ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..
मुळ वेतन | 21700 |
महागाई भत्ता ( 50% – 01.01.2024 पासुन ) | 10850 |
घरभाडे भत्ता ( शहरी भाग 27 %) | 5859 |
वाहन भत्ता | 1224 |
इतर भत्ता ( पुरक / खानपान ) | 3600 |
एकुण वेतन | 43233 |
वजाती (-) | |
NPS | (-3255) |
P.TAX | (-200) |
GIS | (-360) |
एकुण वजाती | (-3515) |
निव्वळ वेतन (In Hand Salary) | 39718 |