@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra current mla tiket cut from all party ] : विधानसभा निवडणुका 2024 करीता राज्यातील विविध पक्षांने विद्यमान आमदारांचे तिकट कापले आहेत , व त्या जागी नव्या उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे . यांमध्ये भाजपा , शिवसेना , काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वच पक्षांने काही विद्यमान आमदारांचे तिकीट कापले आहेत .
काँग्रेस पक्ष : काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणूकीत 5 आमदारांचे तिकीट कापले आहेत , यांमध्ये कोल्हापुर उत्तर मधून जयश्री जाधव , आमगांव मधून सहस्त्राम मोरोती कोरोटे , रावेर मधून शिरीष चौधरी तर श्रीरामपूर मधून लहू कानडे , तर अमरावती मधून सुलभा खोडके यांना तिकीट नाकारण्यात आले आहेत .
भाजपा : भारतीय जनता पार्टी कडून 08 विद्यमान आमदारांचे तिकीट कापले आहेत , यांमध्ये यांमध्ये आर्णी मतदारा संघाचे संदीप धुर्वे , मुंबई बोरिवलीचे सुनिल राणे , उमरखेडचे नामदेव ससाणे , चिंचवड मधून अश्विनी जगताप , आर्वीमधून दादा केंचे , कल्याण ( पुर्व ) मधून गणपत गायकवाड तर वाशिम मधून लखन मलिक तर नागपूर मध्य मधून विकास कुंभारे अशा 8 विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहेत .
राष्ट्रवादी काँग्रेस : यांमध्ये अनिल देशमुख यांना कोटोल मतदार संघातुन शरद पवार गटाने तिकीट नाकारले असून त्या जागी त्यांच्या पुत्रास सलील देशमुख यास तिकीट देण्यात आली आहे . तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मोरगाव मधून मनोहर चंद्रिकापुरे व आष्टी मतदार संघातून बाळासाहेब आजबे यांना तिकीट नाकारण्यात आले आहेत .
शिवसेना : शिंदे गट मार्फत चोपडा येथील लता सोनवणे तर पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांचे तिकीट कापण्यात आले आहेत .