सरकारी कर्मचारी व शिक्षकांचे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीरनामा जाहीर .

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee jahirnama ] : राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच शिक्षकांचे विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जाहीरनामा सोशल मिडीयावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे . यांमध्ये माझे मत माझा मुद्दा या हेडींगखाली जाहीरानामा प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत .सविस्तर जाहीरनामा पुढीलप्रमाणे आहेत ..

  • दि.01.11.2024 नंतर नियुक्त झालेल्या राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ओल्ड पेन्शन तात्काळ लागु करण्यात यावी , तसेच राज्यातील रिक्त असणारे 1 लाख पदांवर पदभरती करण्यात यावी .
  • तसेच राज्यतील शासकीय नोकऱ्यांचे कंत्राट करण / खाजगीकरण करण्याचे निर्णय रद्द करण्यात यावेत .
  • कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागु करण्यात यावी , तसेच संचमान्यता संदर्भातील दि.15.03.2024 रोजीचा शालेय शिक्षण विभाग मार्फत निर्गमित शासन निर्णय रद्द करण्यात यावा .
  • आश्वासित प्रगती योजना नियमित व तात्काळ लागु करण्यात यावी . तसेच ग्रामसेवक , शिक्षणसेवक , आरोग्यसेवक इ. कंत्राट कालावधी हा 03वर्षे ऐवजी 01 वर्षाचा करण्यात यावेत .
  • शिक्षकांना शिक्षणा व्यतिरिक्त इतर अशैक्षणिक कामे लावू नयेत , तसेच शाळा दत्तक देण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा .
  • संगणक परिचालकांना नियमित वेतनश्रेणी देण्यात यावेत .
  • सुविधा पुरविण्याच्या तसेच सुधारणेच्या नावाखाली शासकीय शाळा खाजगी व्यक्ती / कॉर्पोरेट घराण्यांना शाळा दत्तक देण्याचा जीआर रद्द करण्यात यावा ..
  • कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी ..

Leave a Comment