लोकसभा निवडणूक निकाल ओपिनियन पोलनुसार महायुतीला 28 तर महाविकास आघाडीला 20 जागा मिळणार ; जाणून घ्या पक्षानुसार निकालाचे पोल !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी  [ Loksabha Election Opinion poll ] : सध्या राज्यात लोकसभेच्या पहिल्या टप्यातील मतदान उद्यापासून सुरु होत आहेत , यांमध्ये जनतेचा कौल घेवून ओपिनियन पोल जाहीर करण्यात आलेला आहे , यांमध्ये पुर्वीप्रमाणे भारतीय जनता पक्षाला एकतर्फी जागा मिळणार नसल्याचे दिसून येत आहेत .

राज्यांमध्ये जनतेचा कौल पाहता , राज्यातील 48 लोकसभा जागापैकी 28 जागा ह्या महायुतीला मिळणार असल्याचे संकेत आहेत , तर महाविकासला 20 जागा मिळणार असल्याचे पोल नुसार संकेत येत आहेत . या ओपिनियन पोलनुसार महायुती पक्षातील 28 जागा , यापैकी 25 जागा ह्या भारतीय जनता पक्षाला तर 03 जागा ह्या शिवसेना ( शिंदे गट ) गटास मिळण्याची शक्यता आहे .

तर महाविकास आघाडीला 20 जागा मिळयाची शक्यता आहे , यापैकी उद्धव ठाकरे ( शिवसेना ) गटास 10 जागा तर तसेच शरद गटास 0 जागा , तर काँग्रेस पक्षास 05 जागा मिळणार असल्याचे शक्यता ओपिनियन पोलनुसार जाहीर करण्यात आले आहेत . हे सर्व्हे करताना राज्यातील 25 लाख लोकांनी यांमध्ये सहभाग नोंदविला होता , त्यानुसार ही आकडीवारी / ओपिनियन पोल जाहीर करण्यात आलेला आहे .

जर राज्यातील मतदानाच्या टक्केवारीचा विचार केला असता महायुतीला 40.22 टक्के तर महाविकास आघाडीला 40.97 इतर इतर पक्षाला 3.22 टक्के मते मिळणार आहेत . जशी मोदी यांची हवा 2014 व 2019 मध्ये होती , तशी या लोकसभा निवडणूकीमध्ये दिसून येत नाही . जनतेचा कौल नुसार यावेळी  लोकप्रतिनिधीच्या कामावरुन मत करतील .

ओपिनियन पोलनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार , हे पुढील चार्टप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपक्षाचे नावओपिनियन पोलनुसार जागा
01.भारतीय जनता पार्टी25
02.राष्ट्रीय काँग्रेस05
03.शिवसेना ( शिंदे गट )03
04.शिवसेना ( उद्धव गट)10
05.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट )05
06.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट )00

Leave a Comment