Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Maharashtra election 4th stage Election ] ; राज्यात काल दिनांक 13 मे 2014 रोजी चौथ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुका पार पडल्या , सदर निवडणुका यशस्वीरित्या पूर्ण झाल्या असून , या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या टॉप अपडेट खालील प्रमाणे जाणून घेऊयात .
देशामध्ये चौथ्या टप्प्यात एकूण 96 मतदारसंघासाठी निवडणुका पार पडल्या , याची टक्केवारी 63.04% इतकी आहे . यामध्ये देशातील दहा राज्य / केंद्रशासित प्रदेशातील 96 मतदार संघाचा समावेश आहे . यामध्ये जम्मू काश्मीर ,पश्चिम बंगाल ,आंध्र प्रदेश, बिहार झारखंड ,मध्य प्रदेश ,ओडिशा ,तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्य / केंद्रशासित प्रदेश यांचा समावेश आहे .
राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघ करिता निवडणुका संपन्न झाल्या असून , यामध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची टक्केवारी 60.60% इतकी झाली आहे . त्या पाठोपाठ जालना 58. 85% , त्यानंतर बीड मतदार संघात 58.21% तसेच रावेर मतदारसंघात 55.36% , त्या पाठोपाठ औरंगाबाद 54.02% , अहमदनगर 53.27% , शिर्डी 52.27% ,जळगाव 51.98% ,मावळ, 46.03% ,पुणे 44.90% तर शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वात कमी 43.89% इतका मतदान झाले आहे.
तर देशामध्ये महाराष्ट्र राज्याचे चौथ्या टप्प्यातील मतदान 52.49% इतका झाला आहे . सदर मतदान प्रक्रिया चौथ्या टप्प्यातले असून , राज्याचे शेवटचा टप्पा 20 मे 2024 रोजी होणार आहे . त्यानंतर दिनांक 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे .
राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांचा समावेश आहे , यामध्ये अमोल कोल्हे ,पंकजा मुंडे, निलेश लंके ,सुजय विखे पाटील ,रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ, वसंत मोरे, संदिपान भुमरे, रक्षा खडसे ,चंद्रकांत खैरे ,रावसाहेब दानवे, अशा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे . यामुळे जनतेचा कौल व दिगज्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे .
-
सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee extra pay bonus and mahagai Bhatta ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचे अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकुण सॅलरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे . सदरचा 40 दिवस बोनस चा लाभ सैन्य दलातील अधिकारी /…