@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Leave rules regarding paid leave; Maharashtra Leave Rules. ] : महाराष्ट्र राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या रजा नियमावलीनुसार मोबदला सुट्टी कोणत्या कर्मचाऱ्यांस मिळते , किती दिवस मिळते , किती रजा साठवता येते . याबाबतची सविस्तर नियमावली पुढीलप्रमाणे पाहुयात ..
कोणत्या कर्मचाऱ्यांना मोबदला सुट्टी ( रजा ) मिळते ? : मोबदला सुट्टी ( रजा ) ही राज्य शासन सेवेतील निम्नश्रेणी ( गड – ड ) संवर्गातील कर्मचारी तसेच ज्यांना साप्ताहिक रजा अनुज्ञेय आहे , अशा कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची रजा अनुज्ञेय होते .
कोणत्या कारणांसाठी मोबदला रजा मिळते ? : मोबदला रजा ही जादा ( Extra ) कामाच्या बदल्यात अथवा सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाच्या बदल्यात सुट्टी दिली जाते .
किती दिवस साठवता येते : मोबदला सुट्टी ही एका वर्षांमध्ये 3 दिवसांपेक्षा ( 03 मोबदला सुट्या ) अधिक दिवस साठवता येत नाहीत . अथवा सदर मोबदला सु्ट्या पुढील वर्षांकरीता उपयोगात ( वापरता ) आणता येत नाहीत .
पुर्व परवानगीची आवश्यकता : मोबदला रजा ही सुट्टीच्या दिवशी अथवा जादा काम केल्याच्या बदल्यात दिली जात असते , सदर सुट्टी घेताना कार्यालय प्रमुखाची पुर्व परवानगी घेणे आवश्यक असेल .
- 14 एप्रिल : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राप्त केलेल्या 32 पदवी व त्यांना ज्ञात असणाऱ्या 12 भाषांची यादी जाणून घ्या सविस्तर !
- निर्धन रुग्ण व गरीब रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय उपचार ; सरकारच्या धर्मदाय योजना बाबत जाणून घ्या सविस्तर !
- आधार बायोमेट्रीक फेस रिडिंग हजेरी राज्यातील कर्मचाऱ्यांचा विरोध ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- कर्मचाऱ्यांचे वेतन / थकीत व इतर देयके अदा करणेकामी , अनुदान वितरण ; GR निर्गमित दि.09.04.2025
- दिनांक 08 एप्रिल 2025 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !