@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत गट ड संवर्गातील शिपाई पदांसाठी रिक्त जागांवर नियमित ( पर्मनंट ) पद्धतीने भरती राबविण्यात येत आहेत . सदरची भरती ही लातुर जिल्हा न्यायालय आस्थापनेतील रिक्त शिपाई पदांसाठी राबविण्यात येत आहेत .सदर पदांसाठी किती पगार मिळणार , शैक्षणिक पात्रता किती असणार , एकुण किती पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
गट ड संवर्गातील शिपाई ( सफाईगार ) या रिक्त पदांच्या एकुण 13 [ 10 + 03 ( प्रतिक्षा यादी ) ] जागेसाठी भरती राबविली जात आहे .
पात्रता किती असणार आहे : सदर सफाईगार या पदासाठी उमेदवार हे सुदृढ व सफाईगार या पदासाठी काम करण्यास सक्षम असणे आवश्यक असेल . इतर कोणतीही शैक्षणिक पात्रतेची अट असणार नाही .
किती पगार मिळणार : सदरचे पदे हे नियमित रिक्त पदांवरील असल्याने , सफाईगार या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार 15,000-47600/- या वेतनश्रेणी प्रमाणे पगार मिळेल .
अर्ज कसा कराल ? : सदर पदांकरीता अर्ज करण्यासाठी व सविस्तर जाहीरात पाहण्यासाठी खाली नमुद लिंकवर क्लिक करावेत ..
-
सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee extra pay bonus and mahagai Bhatta ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचे अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकुण सॅलरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे . सदरचा 40 दिवस बोनस चा लाभ सैन्य दलातील अधिकारी /…