आता जमीनीची सुपिकता वाढविण्यासाठी कृत्रिम पद्धतीचा होतोय वापर !

Spread the love

@marathiprasar बालाजी पवार प्रतिनिधी : आजच्या काळांमध्ये शेती करणे खुपच सोपे झालेले आहेत , नविन तंत्रज्ञान तसेच नविन खतांचा वापर करुन जमीनची उत्पादन क्षमता अधिकच वाढविण्यात येत आहेत . परंतु  आपल्या माहितीस्तव रासायनिक खतांचा बेसुमार वापरांमुळे जमीनीच सुपिकता नाहीशी होते , यामुळे जमीनीची सुपिकता कायम ठेवण्यासाठी काही उपाय योजनांचा वापर करणे अधिक श्रेयस्कर होईल .

आजकाल रासायनिक खतांच्या वापरांमुळे शेतकऱ्यांना अनेक आजार होत आहेत . यांमध्ये पंजाब , हरियाणा हे असे राज्य आहेत , तेथे रासायनिक खतांचा सर्वाधिक वापर होतो . शिवाय अनावश्यक खतांचा वापर देखिल तेथील शेतकरी करीत असतात , जसे कि पिकांमध्ये गवत येवू नये , म्हणून पहिल्यांदाच गवत न येणाऱ्या रसायनांची फवारणी केली जाते . जे कि अत्यावश्यक नाही . ज्यामुळे जमीनीची ऱ्हास तर होतेच परंतु त्यांचा विपरित परिणाम शेतकऱ्यांवर होत असतो .

जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी कोणते उपाय कराल ? : जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी प्रथम तर रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळावा , त्यानंतर आवश्यक असेल तरच फवारणी करावी . जसे कि गवत येवू नयेत म्हणून पुर्वीच फवारणी करु नयेत . त्याचबरोबर रासायनिक खतांच्या वापरापेक्षा सेंद्रीय खतांचा वापर करावा . सेंद्रीय खतांमुळे जमीनीची सुपिकता वाढतेच तर जमीनीमधील पोषण द्रव्यांचा कोणत्याही परिस्थितीमध्ये नाश होत नाहीत .

सेंद्रीय खतांमध्ये गांडूळ खत , शेणखत , पालापाचोळा पासून बनविण्यात आलेला खत , कोंबडीच्या विष्ठेपासून बनविण्यात आलेला खत अशा खतांचा वापर केल्यास , जमीनीची सुपिकता वाढविण्यास मदत होते .

सेंद्रीय खतांमुळे उत्पादनांमध्ये होते वाढ : सेंद्रीय खतांच्या वापरामुळे उत्पादनांमध्ये वाढ तर होतेच तर सेंद्रीय खतांपासून निर्मित झालेले पिक हे सेवणांसाठी अधिक पोष्टीक असते . यामुळे आपल्या शरीरास आवश्यक असणारे योग्य ते घटक आपल्याला सहज उपलब्ध होतात .सेंद्रीय खतांच्या निर्मितीसाठी गायी / म्हशींच्या शेणांपासून मिळणार खत हे सर्वाधिक लाभ दायक मानले जाते .

आपल्या जमीनीमध्ये किती प्रमाणात कोणते पोषक तत्वे आहेत , सामु किती आहे , याची तपासणी करु घ्यावीत व ज्यांचे प्रमाण हे कमी आहेत त्यांचे पोषण असणाऱ्या खतांची अधिक मात्रांमध्ये वापर करण्यात यावा .. जेणेकरुन पिकांस जमीनीमधून सर्व प्रकारचे पोषण तत्वे मिळण्यास मदत होईल .

Leave a Comment