भारतीय रेल्वे ( Indian Railway ) विभाग मध्ये तब्बल 9,144 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर महाभरती प्रक्रिया करीता आवश्यक शैक्षणिक / व्यावसायिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नमुद कालावधीत आपले आवेदन सादर करायचे आहेत .
पदभरती पदांचे नावे व पदांची संख्या : सदर महाभरती प्रक्रिया मध्ये तांत्रिक ग्रेड I सिग्नल ( टेक्निशियन ग्रेड I ) पदांच्या एकुण 1092 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . तर टेक्निशियन ग्रेड III पदांच्या एकुण 8,052 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . असे एकुण 9,144 जागेकरीता मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता ( Qulification ) : वरील पैकी टेक्निशियन ग्रेड I सिग्नल पदांकरीता उमेदवार हे B.SC अथवा इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर यांमध्ये टेक्निशियन ग्रेड III पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयाची मर्यादा : दिनांक 01.07.2024 रोजी उमेदवाराचे वय पुढीलप्रमाणे असावेत , यापैकी SC /ST प्रवर्ग करीता 05 वर्षांची तर OBC प्रवर्ग करीता वयात 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अ.क्र | पदनाम | वयोमर्यादा |
01. | टेक्निशियन ग्रेड I सिग्नल | 18 ते 36 वर्षे |
02. | टेक्निशियन ग्रेड II | 18 ते 33 वर्षे |
ऑनलाईन माध्यमातुन दिनांक 08.04.2024 पर्यंत आवेदन सादर करु शकता , ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी https://www.rrbapply.gov.in/ या वेबसाईवर क्लिक करावेत .
जाहीरात पाहण्यासाठी .. CLICK HERE