@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding increased salary increment while fixing salary after promotion. ] : पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करत असताना एक काल्पनिक वेतन वाढ देणेबाबत , ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार शिक्षक पदांवरुन पदोन्नती दिल्याच्या नंतर त्यांना एक काल्पनिक वेतन वाढ देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे . याबात काही अटी / शर्ती यांमध्ये नमुद करण्यात आलेल्या आहेत .
म.ना.सेवा ( वेतन ) नियम 1981 मधील नियम 11 मध्ये करण्यात आलेल्या तरतुदीनुसार नविन पदावर नियुक्तीमुळे त्याच्या पुर्वीच्या कर्तव्यापेक्षा / जबाबदारीपेक्षा अधिक जबाबदारी / कर्तव्ये येत असतील व गट 2 ( वर्ग ब ) संवर्गापेक्षा वरच्या दर्जाचे नसणारे पद सदर कर्मचारी धारण करत असेल .
तर त्यास वरच्या पदाच्या समय श्रेणीमधील प्रारंभिक वेतन हे खालच्या पदाच्या ज्या टप्याला त्याचे वेतन असेल त्या टप्याला 01 वेतनवाढ मिळवल्यानंतर व वेतनामधील कमाल वेतन घेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मागील वेतनवाढ इतकी रक्कम दिल्यावर जे मानिव वेतन येईल त्याच्या पुढील टप्यावर वेतन निश्चित करण्यात येईल , अशी बाब नमुद करण्यात आलेली आहे .
वरील सेवानियमातील बाबींचा विचार करता पदवीधर प्राथ. ,मुख्याध्यापक पद , केंद्रप्रमुख या पदांवर पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांच्या कर्तव्ये तसेच जबाबदारीमध्ये वाढ होत असते , त्यामुळे अशा पदवीधर प्राथमिक शिक्षक , पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक , तसेच केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नतीने नियुक्ती घेतल्यानंतर सदर शिक्षकास एक वेतनवाढ देवून त्याची वेतन निश्चिती करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर शासन निर्णय हा निर्गमित झाल्यापासुन म्हणजेच दिनांक 26 सप्टेंबर 2023 तारखेपासुन लागु करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .


आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
- 01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !
- सरकारी / निमसरकारी / महामंडळे मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेवू शकतो का ?
- दिनांक 25 ते 28 जुन दरम्यान पाऊसमान अंदाज : जाणून घ्या सविस्तर !
- सरळसेवा पदभरती प्रक्रिया मध्ये किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय ! जाणून घ्या सविस्तर परिपत्रक !