@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी [ Important circular regarding employee leave rules issued on 28.03.2025 ] : कर्मचाऱ्यांच्या रजा नियम संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय , मुंबई विभाग ,मुंबई कार्यालय मार्फत दिनांक 28 मार्च 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्तीच्या संदर्भाधिन नियमावलीनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे . यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी विनियमन अधिनियम 1977 नुसार सहायक शिक्षक ( परिविक्षाधीन ) म्हणून नेमणूक करण्यात आलेली प्रत्येक व्यकती तीन वर्षाच्या कालावधीकरीता परिविक्षाधीन असेल असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच सदर परिपत्रकानुसार कळविण्यात आले आहेत कि ,महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती ( नियमावली ) 1981 नियम 16 ( 23 ) नुसार अस्थायी ( परिविक्षाधीन ) कर्मचाऱ्याला नैमितिक व प्रसुती रजेव्यतिरिक्त अन्य कोणतीी रजा सेवेतुन मिळण्याचा हक्क असणार नाही .
हे पण वाचा : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
तसेच अस्थायी कर्मचाऱ्यांची जेव्हा स्थायी पदावर नियुक्ती करण्यात येईल तेव्हा त्याची पुर्वीची सलग सेवा स्थायी कर्मचारी म्हणून असती तर ती रजा मिळण्यास तो पात्र झाला असता ती रजा मिळण्याचा त्यास हक्क असेल , असे नमुद करण्यात आले आहेत .
त्याचबरोबर शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निणर्यानुसार खाजगी शाळेतील कर्मचारी यांच्यासाठी लागु करण्यात आलेले अर्जित रजा , वैद्यकीय रजा , बालसंगोपन रजा व इतर विशेष रजा लागु राहतील , त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत .

- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !