आज दिनांक 01 एप्रिल पासून “या” नवीन नियमांची अंमलबजावणी ; जाणून घ्या नवीन नियम !

Spread the love

@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी  [ “These” new rules will be implemented from today, April 1st; Know the new rules.. ] : आज दिनांक 01 एप्रिल 2025 पासून देशांमध्ये काही नवीन नियमांची अंमलबजावणी होणार आहे , या संदर्भातील नवीन नियमावली पुढील प्रमाणे जाणून घेवूयात .

01.कर प्रणाली : आर्थिक वर्ष 2025- 26 हे दिनांक 1 एप्रिल 2025 पासून सुरू होत असून , या वर्षांमध्ये नवीन कर प्रणाली लागू होत आहे . यामध्ये 12 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त उत्पन्न असणार आहे .

02.UPI ID : मागील 12  महिन्यापासून वापरात नसणारे UPI ID बंद होणार आहेत . सदरचा निर्णय घोटाळे , फसवणूक रोखण्यासाठी यु .पी .आय नियमांमध्ये हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे .

03. पॅन आधार लिंकिंग अनिवार्य : लाभांश प्राप्ती करिता यापुढे आधार – पॅन लिंक असणे आवश्यक असणार आहे . अन्यथा दिनांक 01 एप्रिल नंतर आधार –  पॅन लिंक नसणाऱ्यांना लाभांश मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे .

04. रेस्टॉरंट हॉटेल्स सेवावर यापुढे 18% GST रक्कम द्यावी लागणार आहे . यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे .

05. खात्यामध्ये किमान रकमेची आवश्यकता : बँकेमध्ये खात्यात किमान रक्कम असणे आवश्यक असणार आहे , अन्यथा एक एप्रिल नंतर किमान रक्कम नसणाऱ्या ग्राहकांना दंड भरावा लागणार आहे .

Leave a Comment