@marathiprasar पुजा पवार प्रतिनिधी : सर्वांनाच आयुष्यात श्रीमंत व्हावेसे वाटते , परंतु अनेक जन आयुष्यभर कष्टच करत राहतात , परंतु कधीच लक्झरी आयुष्य जगता येत नाही , हे असे का होत असेल ? याचे मुख्य कारण म्हणजे आपण पैसाचे योग्य प्रकारे नियोजन करत नसतो , यामुळे आपण कमी वयात श्रीमंताची पातळी गाठू शकत नाही .
तर आपण पाहत असाल तर भारतांमध्ये मारवाडी , सिंधी ह्या समुदायाचे लोक आपल्या आयुष्यात पैसा कशा प्रकारे कमवावे , याचे कला त्यांना घरातुन मिळत असते . त्यांना लहानपणापासून बचतीचे धडे दिले जाते , तर होणाऱ्या खर्चाचे हिशोब ठेवण्याची सवय असते , ज्यामुळे आपल्याला कळते कि , आपण कोणत्या गोष्टीवर अधिक पैसा खर्च करतोय , जो कि पुढील महिन्यांत सदरचा खर्च अनावश्यक असेल तर टाळता येईल .
गुंतवणुकीवर अधिक भर : आपण जर अनावश्यक गोष्टीवर अधिक खर्च करत असाल तर आपण आयुष्यात कधीच मोठे होणार नाही , यामुळे आपण आयुष्यात नेहमीच गुंतवणूक करत रहावे लागेल ,ही गुंतवणुक ही अल्प असेल तरी चालेल परंतु नियमित असली पाहीजे , ज्यामुळ आपल्याला नियमित गुंतवणुक करण्याची सवय लागेल व अनावश्यक खर्च टाळण्यास मदत होईल .
गुंतवणुक कुठे करावे ? : आपणास जर गुंतवणूक करायची असल्यास , आपली जोखिम क्षमता कमी असल्यास , बँके आरडी , मुदत ठेव , विविध सरकारी योजना , यापैकी पोस्टाच्या योजना यांमध्ये व्याजदर अधिक मिळतो , तसेच सोन्यात गुंतवणुक ( सोने हे ऑनलाईन अथवा ऑफलाईन खरदी करुन ) गुंतवणु करु शकता . तर आपली जोखीम क्षमता अधिक असल्यास ,
आपण चांगल्या कंपनीचे शेअर विकत घ्यावेत , तसेच म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी , ज्यांमध्ये जोखीम असते , परंतु मिळणारा फायदा देखिल अधिक असतो . जे कि म्हणातात ना High Risk High Profit & Low Risk Low Profit अशी वाणिज्य मधील म्हण आहे . यामुळे आपल्या रिस्क नुसार गुंतवणुक करावी ..
लक्झरी वस्तु वर पैसा खर्च करु नयेत : आपण जर लक्झरी वस्तुवर अधिक पैसा खर्च करत असाल तर , आपणांस कमी वयात कधीच श्रीमंत होता , येणार नाही तोच पैसा व्यापार / बिझनेस , गुंतवणुक करीता वापरावेत , म्हणजेचे आलिशान कार , मोटारसायकल , नवनविन कपडे खरेदी करीता पैसा खर्च न करता गुंतवणुक व व्यापार / बिझनेटच्या वाढीकरीता पैसा वापरावे .