केसगळती थांबविण्यासाठी तसेच दाट काळेभोर केसासाठी करा हा अत्यंत सोपा / लाभदायक घरगुती उपाय !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ hibiscus for hair Growth home made upay ] : आजकाल तरुण पणांपासुनच केस गळती तसेच टक्कल पडणे या प्रकारच्या संमस्या उद्भवत आहेत . याकरीता बाजारांमध्ये अनेक प्रकारचे औषधे , तेल उपलब्ध आहेत . परंतु त्यापासून रिझल्ट मिळण्याचे प्रमाण फारच कमी आहे . याकरीता घरगुती जास्वंदीच्या फुलांपासून तेल बनवून केसाला लावल्यास दाट , घनदाट केस होईल .

जास्वंदीचे फुल आपल्याला सहज उपलब्ध होईल , त्यांच्या पासुन आपल्याला मिश्रण तयार करण्यासाठी जास्वंदीचे 3 ते 4 फुले तसेच जास्वंदीचे 8 ते 10 पाने त्याचबरोबर कडीपत्ता 1 पुर्ण पान, दही 1 कप , कोरफडीचा गर 2 चमच अशा प्रकारचे साहित्य आपल्याला लागणार आहेत . ज्यांपासुन आपणांस मिश्रण तयार करुन तेल तयार करायचे आहेत , त्याची संपुर्ण कृती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

सदरचे सर्व साहित्य एकत्रित करुन मिक्सरच्या साहाय्याने पेस्ट तयार करुन घ्यावेत . सदरची पेस्ट 15 दिवस चालेल , याकरीता सदर पेस्टमध्ये अत्यल्प प्रमाणात खोबरतेल टाकल्यास काही हरकत नाही . सदरचे मिश्रण आपण रोज रात्री झोपण्यापुर्वी लावावेत , तर सकाळी उठुन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत .

होणारे फायदे : या मिश्रण आपण रोज लावल्यास , आपली केस गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल , त्याचबरोबर आपले केस काळे व घनदाट होण्यास मदत होते . जास्वंदाचे फुल व पाने केसाच्या समस्यासाठी सर्वाधिक लाभदायक असते , यामुळे ज्यांना केसांची समास्या आहेत , अशांनी हे मिश्रण तयार करुन वापर करावा .

बाजारांमध्ये केसगळती साठी मोठ्या महागड्या औषधे , तेल उपलब्ध आहेत , ज्यांचे रिझल्ट देखिल खुप कमी आहे , परंतु सदर जास्वंदाचे मिश्रण आपणांस थोडा उशिरा फरक जाणवेल , परंतु खात्रीशिर लाभ होईल .

Leave a Comment