Khushi Pawar प्रतिनिधी [ Heavy rainfall warning in these districts of the state for the next 2-3 days ] : यंदाच्या वर्षी अवकाळी पावसाची हजेरी खुपच लांबली आहे , तर दुसरीकडे देशामध्ये केरळ भागात मान्सुनचे आगमनाची तारीख जवळ आली आहे .
पाउस सतत पडत असल्याने शेतीची कामे बाकी आहेत , यामुळे यंदाच्या पेरणी लांबणार हे निश्चित आहे . तर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये पुढील 2-3 दिवस काही भागांमध्ये अतिवृष्टीचा जोरदार इशारा देण्यात आला आहे . यामुळे सदर भागातील लोकांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत .
या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 2-3 दिवस मध्य महाराष्ट्रातील जिल्हे तसेच मराठवाड्यातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे .
तर कोकण तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाट माथा परिसरात तुरळक भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यामुळे या सदर भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत .
राज्यातील सिंधुदुर्ग , रत्नागिरी , रायगड या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्ततिवण्यात आलेली आहे , तसेच कोल्हापुर , पुणे , सातारा व अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये तुरळक अशा ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्ततवण्यात आलेली आहे .
तर राज्यातील हिंगोली , परभणी , धाराशिव , बीड , सोलापुर , सांगली या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटसह जोराचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तसेच विदर्भासाठी पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !