केसांची गळती थांबविण्यासाठी करा हे घरगुती उपाय ,लवकरच व दाट केसांची होईल वाढ !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपले केस जर वारंवार गळत असतील तर , काही घरगुती उपाय करुन केंसाची गळती थांबवू शकता . आपले केस खुपच मोठ्या प्रमाणांमध्ये गळत असतील , तर अशा वेळी  डॉक्टरांकडून उपचार घेण्यापेक्षा घरगुती पद्धतीने केलेले उपचार अधिक लाभ दायक ठरत असते .

केस गळतीचे कारणे : केस गळतीचे प्रमुख कारणे म्हणजे थायरॉईड असल्याने केसांची गळती मोठ्या प्रमाणात होते , त्याचबरोबर ताण -तणाव याशिवाय आजारपण , शस्त्रक्रिया , शिवाय आघात या शिवाय शरीरामध्ये पौष्टिक घटकांची कमतरता होणे , या शिवाय अनुवंशिकतेमुळे केंसाची गळती होते .

केसांची योग्य काळजी न घेणे , पाण्याच्या वापरांमध्ये तसेच हवामांमध्ये बदल झाल्यास , केसांची गळती होत असते . स्त्रीयांपेक्षा पुरुषांचे केस गळतीचे प्रमाण अधिक असते , कारण स्त्रीया केसांची योग्य ती काळजी घेत असते . यामुळे स्त्रीयांचे केस गळतीचे प्रमाणे खुपच कमी असते . केसांच्या वाढीकरीता काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणे पाहुयात ..

कडीपत्ताचे पाने जवळपास 10-15 पाने , काळे तीळ , मेथीचे दाणे , आळशी , पांढरे तीळ , प्रत्येकी एक चमचा , 3 ते 5 लवंगे , मोहरीचे तेल , नारळाचे तेल प्रत्येक 1 कप घेवून मिश्रण करावेत , व गॅसवर गरम करुन गाळणीने गाळून एक हवाबंद डब्यांमध्ये ठेवून द्यावेत . हे मिश्रण झालेले तेल आडवड्यातुन दोन – तीन वेळा लावल्यास आपले केस निश्चितच मोठे तसेच घनदाट होण्यास मदत होईल .

सदरचे मिश्रण हे  झालेले तेल हे आठवड्यांमधून दोन -तीन वेळा रात्रीच्या वेळी लावावेत , हलक्या हाताने डोक्यावर मालिश करावी . तर सकाळी शॉम्पुने स्वच्छ धुवावेत, शॉम्पु हा केमिकल युक्त नसला पाहिजे . शॉम्पू मध्ये शिकाकाई हे शॉम्पु वापरणे अधिक फायदेशिर ठरते ..

Leave a Comment