सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात महागाई भत्ता वाढीबरोबर या 02 भत्त्यामध्ये मिळणार वाढ ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government employees  two allowances increase in New year ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षामध्ये मोठा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे , तो म्हणजे महागाई भत्ता (DA) वाढीबरोबरच खाली नमूद 02 भत्त्यामध्ये वाढ होणार आहे , ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारामध्ये मोठी वाढ होईल .

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 पासून 3%  DA वाढ मिळाली , ज्यामुळे एकूण महागाई भत्ता (DA ) 53% इतका झाला आहे . तर पुन्हा एकदा माहे जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता (DA ) मध्ये वाढ होणार आहे . याशिवाय इतर दोन भत्त्यामध्ये देखील वाढ होणार आहे .

महागाई भत्ता 50% पेक्षा अधिक झाल्यास , सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता (HRA) मध्ये वाढ होईल , अशी तरतूद सातवा वेतन आयोगामध्ये (7th Pay commission) नमूद आहे . यानुसार  सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) माहे जुलै 2024 मध्ये  50% पेक्षा अधिक झाल्याने घरभाडे भत्ता (HRA) मध्ये वाढ होणार आहे .

याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफॉर्म भत्ता व नर्सिंग भत्ता 25 टक्क्याने वाढविण्यात आला असून , सदरचा भत्ता आगामी पगारात प्रत्यक्ष वाढवून मिळणार आहे . सदरचा भत्ता हा केंद्रीय कर्मचारी याशिवाय केंद्रशासित प्रदेशातील सर्व सरकारी दवाखाने मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे .

सदर भत्त्यातील वाढ ही केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची एक प्रकारे खास भेट ठरणार आहे . सदर भत्ता वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारामध्ये मोठी वाढ दिसून येईल .

Leave a Comment