@marathiprasar खुशी पवार : घरगुती उपाय करुन कायमस्वरुपी चेहऱ्यावर उजाळा होण्यासाठी काही महागड्या क्रिमचा वार करण्याची आवश्यक नाही . तर काही घरगुती उपाय करुन कायमस्वरुपी गोरेपणा होता येईल . अशा काही घरगुती टिप्स कोणकोणत्या आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.लिंबुचा वापर : जर आपली त्वचा खुपच काळसर पडली असेल , अशा वेळी लिंबू हे अधिक फायदेशिर ठरणार आहेत . त्वचेवर असणारे डाग लिंबूमूळे नाहिशे होवून जातात , लिंबाच्या रसाबरोबर बेसन पिठ अथवा काकडी सोबत त्वच्यावर लावावेत . जेणेकरुन आपल्या चेहऱ्यावरील डाग कायमचे नाहिशे होतील व चेहऱ्यावर उजाळा येईल .
02.बेसन पिठ : बेसन पिठ हे चेहरा उजाळा करण्यासाठी सर्वाधिक लाभदायक घरगुती पदार्थ आहे , भारतांमध्ये बेसन पीठ खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी नेहमीच वापरण्यात येत असतो . बेसन पिठाचे हळद सोबत मिश्रण करुन आपल्या चेहऱ्यावर लेप दिल्यास चेहऱ्यावर उजाळा येईल .
03.चारोळी : चारोळी दुधात घालून चेहऱ्यावर लावल्यास सात दिवसानंतर चेहऱ्यावर उजळ येण्यास सुरुवात होईल . त्याचबरोबर चेहऱ्यावरील सर्व डाग नाहिशे होवून जातील .
04.बेसन , हळद , चंदन यांचे मिश्रण : सर्वाधिक लाभदायक मिश्रण म्हणजे बेसन पीठ , हळद व चंदन यांच्यासोबत पाणी अथवा दुधाने मिश्रण तयार करुन चेहऱ्यावर लावल्यास , आपला चेहरा दोन दिवसांमध्ये उजळायला लागेल , चेहरा कायमस्वरुपी उजळा ठेवण्यासाठी आठवड्यातुन निदान 2-3 वेळा हे मिश्रण लावणे लाभदायक ठरेल .
आजकाल बाजारांमध्ये अनेक प्रकारचे फेसवॉश तसेच केमिकल युक्त क्रिम आलेले आहेत , या क्रिम / फेसवॉश मुळे चेहऱ्यावर दुष्परिणाम होतात . म्हणून आपण चेहऱ्याला उजळ देण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करणे अधिक सोयीचे ठरेल .