निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांसाठी आनंदाची बातमी ; अखेर डी.ए वाढीबाबत शासन निर्णय निर्गमित दि.28.02.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Good news for pensioners; Finally, the government decision regarding DA increase ] : राज्य निवृत्तीवेतन धारक / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी अखेर डी.ए वाढीबाबत वित्त विभागांकडून दिनांक 28.02.2025 रोजी अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार राज्यातील सातवा वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना त्यांच्या मुळ निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतनाच्या एकुण रकमेवर दिनांक 01.07.2024 पासुन अनुज्ञेय महागाई वाढीचा दर 50 टक्के वरुन 53 टक्के असा सुधारित करण्यात आला आहे .

सदर महागाई भत्ता वाढ ही दिनांक 01 जुलै 2024 पासुनच्या थकबाकीसह माहे फेब्रुवारी 2025 च्या निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतनासोबत रोखीन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच असुधारित वेतनश्रेणीत म्हणजेच सहाव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना दिनांक 01.07.2024 पासुन 246 टक्के दराने महागाई भत्ता वाढ देण्यात आली आहे .यांमध्ये दिनांक 01.07.2024 पासुन चा फरक माहे फेब्रुवारी 2025 च्या निवृत्तीवेतनासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच असुधारित वेतनश्रेणीत म्हणजेच पाचव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना दिनांक 01.07.2024 पासुन 455 टक्के दराने महागाई भत्ता वाढ देण्यात आली आहे .यांमध्ये दिनांक 01.07.2024 पासुन चा फरक माहे फेब्रुवारी 2025 च्या निवृत्तीवेतनासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment