@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government circular issued regarding setting a time limit for submitting medical reimbursement payments ] : जिल्हा परिषद कर्मचारी यांचे वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके सादर करण्यासाठी कालमर्यादा विहीत करणेबाबत , ग्राम विकास विभागामार्फत दिनांक 24.02.2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
ग्राम विकास विभागाकडे जिल्हा परिषद कर्मचारी यांचे वैद्यकीय देयके प्रतिपुर्ती मिळणेबाबतचे मुळ प्रस्ताव मंजूरीसाठी प्राप्त होतात . तथापि सदरचे प्रस्ताव जवळपास 01 ते 02 वर्षे इतक्या विलंबाने शासनांस प्राप्त होत आहे . ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .
यामुळे मा.मंत्री ( ग्रामविकास व पंचायत राज ) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता प्रधान सचिव यांच्या समिती कक्ष बांधकाम भवन मुंबई येथे आयोजित बैठकीत मा.मंत्री महोदयांनी वैद्यकीय प्रतीपुर्ती प्रलंबित देयक संदर्भात तात्काळ कार्यवाही करणे बाबत तसेच जिल्हा स्तर व विभागीय स्तर यांनी विहीत कालमर्यादेत देयके शासनास सादर करणेबाबत खालीलप्रमाणे कालमर्यादा ठरवून देण्यात येत आहे .
तालुका स्तर : संबंधित कर्मचारी यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांच्या आत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे सादर करण्याचे ( यांमध्ये पंचायत समिती कार्यालय ) निर्देश देण्यात आले आहेत .
जिल्हा परिषद स्तर ( मुख्य कार्यकारी अधिकारी ) : तालुका स्तरावरुन प्राप्त झालेला प्रस्ताव 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
विभागीय आयुक्त कार्यालय : जिल्हा परिषद कडून प्रस्ताव प्राप्त झालेला प्रस्ताव 30 दिवसांत शासनास सादर करण्याचे तर , ग्रामविकास विभागाने उपस्थित केलेल्या त्रुटींची पुर्तता अहवाल 30 दिवसांत शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025
- आता जादा कामासाठी या शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुधारित मानधन ; GR निर्गमित दि.21.03.2025
- मार्च पेड इन एप्रिल वेतन देयक अदा करणेबाबत निधीचे वितरण ; शासन निर्णय निर्गमित दि.20.03.2025
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम अदा करणेबाबत परिपत्रक दि.11.03.2025