आयुष्यात कायम निरोगी व तंद्रुस्त राहण्यासाठी , आरोग्य शास्त्राचा एक , तीन व सातचा फार्मुला वापरल्यास , कायम निरोगी व तंद्रुस्त राहता येईल . आपल्या आरोग्य शास्त्रांमध्ये नमुद सदर फॉर्म्युला नमुद करण्यात आलेला आहे . या बाबत सविस्तर माहिती पुढीप्रमाणे घेवूयात ..
01 ( एक ) फॉर्म्युला : एक म्हणजे एक तास नियमित रोज व्यायाम करणे होय , यांमध्ये सुर्यनमस्कार नियमित केल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाहीत . कारण सुर्यनमस्कार हा व्यायामाचा राजा मानला जाते , या व्यायाम प्रकारामुळे आपल्या सर्व स्नायुंचा योग्य प्रकारे व्यायाम होतो . या एक तासांमध्येच 15-20 मिनिटे योगासने , ध्यान धारणा करणे आवश्कय आहेत . ज्यामुळे आपल्या बुद्धीस चालना मिळते .
सातचा फॉर्म्युला : आपल्या शरीराला झोप खुप महत्वाची आहे , जर झोप योग्य प्रकारे न झाल्यास आपला पुर्ण दिवस निष्काळजीपणाचा जातो . यामुळे आपण रोज 07 तास झोप घेणे आवश्यक असते . शास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे कि , झोप ही रोत्रीच्या प्रहरी घेणे लाभदायक असेल , सकाळ सत्रातील झोप ही आपल्या शरीरास वाईट असते . यामुळे झोप ही रात्री 9 वाजेनंतर तर सकाळी 5 वाजेदरम्यानच्या कालावधीमध्ये 7 तास इतकी झोप घेणे आवश्यक असते .
तीनचा फार्मुला : ज्या प्रकारे आपल्या शरीराला झोप , व्यायाम महत्वाचा आहे , त्याच प्रकारे शरीराला तीन वेळेचे भोजन देखिल खुप महत्वाचे आहे . आज काल आपण पाश्चात्य संस्कतीचा अवलंब करुन आपल्या जेवणांमध्ये बदल केलो आहोत . पण ते चुकीचे आहे , आपल्या भारतीय शास्त्रानुसार सकाळच्या वेळी नाष्टा ( अल्पोहार ) न करता सकाळचे जेवण हे भरपेठ केले पाहिजेत , तर दुपारचे जेवण हे मोजके केले पाहिजे तर रात्रीचे जेवण अल्प ( अल्पोहार ) केले पाहिजे .
जसे कि आपल्या शास्त्रांमध्ये एक म्हण आहे कि , सकाळचे जेवण हे राजासारखे तर दुपारचे जेवण हे प्रधानासारखे तर रात्रीचे जेवण हे भिकाऱ्यासारखे केले पाहीजेत . कारण सकाळी खालेले जेवण हे 18 तासांपर्यंत सहज पचन होवून जाईल , यामुळे सकाळी जड खाद्य खाल्ले तर दुसऱ्या दिवसापर्यंत ( प्राथ : विधी ) पर्यंत पचून जाईल . तर दुपारच्या जेवणांमध्ये मोजकेच जेवण म्हणजे ज्या पदार्थांमधून आवश्यक प्रथिने , स्निग्ध पदार्थ भेटतील असेच खाद्य पदार्थ खाले जावेत .
तर सायंकाळच्या जेवणांमध्ये कमी जड असणारे हलके आहार घेणे आवश्यक असते , जसे कि , फळ आहार घेणे आवश्यक असते . ज्यामुळे आपणांस आयुष्यात कायम निरोगी व तंद्रुस्त राहता येईल .