राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनाच्या माध्यमातुन 50% अनुदानात घ्या ; विविध कृषी यंत्रे व अवजारे ( ट्रॅक्टर , मिनी ट्रॅक्टर / अवजारे इ.)

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानातुन विविध कृषी यंत्रे व अवजारे दिले जातात , या योजनांच्या माध्यमातुन कोणत्या यंत्रास किती टक्के सबसिडी मिळते , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात..

या योजनांच्या माध्यमातुन ट्रॅक्टर , पॉवर टिलर , ट्रॅक्टर / पॉवर टिलर चलित अवजारे , बैल चलित यंत्र / अवजारे , प्रक्रिया संच , स्वयंचलित यंत्रे , फलोत्पादन यंत्रे / अवजारे , काढणी पश्चात तंत्रज्ञान इ.यंत्रे / अवजारे 50 टक्के अनुदान पर्यंत मिळते . कोणत्या अवजारास किती टक्के पर्यंत अनुदान प्राप्त होते , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे घेवूयात ..

यांमध्ये ट्रॅक्टर , पॉवर टिलर , ट्रॅक्टर / पॉवर टिलच चलित औजारे , स्वयंचलित औजारे , बैलचलित औजारे , मनुष्य चलित औजारे , फलोत्पादन यंत्रे औजारे , काढणी पश्चात तंत्रज्ञान , प्रक्रिया संच , वैशिष्ट्यपुर्ण औजारे अनुसुचित जाती / अनुसुचित जमाती / अल्पभुधारक आणि बहूभूधारक शेतकरी / महीला शेतकरी करीता यंत्रे / औजारांच्या एकुण किंमतीच्या 50 टक्के रक्कम अनुदान ( सबसिडी ) म्हणून मिळते . तर इतर लाभार्थ्यांसाठी 40 टक्के अनुदान ( सबसिडी ) देण्यात येते .

योजनेचे मुख्य उद्देश : सदर योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ज्या ठिकाणी शेतीमधील उर्जेचा वापर हा कमी प्रमाणात होत असेल अशा ठिकाणी शेतकरी तसेच अल्प व अत्यल्प जमीन धारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यंत्रे / औजारे यांचा लाभ देवून , शेती क्षेत्रांमध्ये आधुनिक यंत्रे / औजारांचा अधिकाधिक वापर करुन उत्पन्न वाढविणे हा आहे .

या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता : सदर योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांकडून आधार कार्ड असणे आवश्यक असणार आहेत . त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे सातबारा व आठ उतारा असणे आवश्यक असेल . तसेच शेतकऱ्यांस जातीय कोट्यातुन लाभ घ्यायचा असल्यास , त्यांच्याकडे जातीचा दाखला असणे आवश्यक असेल .

तसेच या योजनांच्या माध्यमातुन फक्त एकाच औजाराकरीता अनुदान देय असणार आहेत ,ज्यांमध्ये ट्रॅक्टर अथवा अवजारे . एखाद्या घटक अथवा औजारांकरीता लाभ घेतला असल्यास , सदर घटक  / औजारांकरीता पुढील 10 वर्षांकरीता आवेदन सादर करता येणार नाही .

अर्ज कसा कराल : या योजना अंतर्गत लाभ घेण्याकरीता आपल्याकडे सातबारा , आधारकार्ड , आठ अ दाखला , यंत्रे / औजारे खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्था दिलेला तपासणी अहवाल , जातीचा दाखला , स्वयंघोषणा पत्र , पुर्व संमती पत्र  इ. कागतपत्रांसह महाडीबीटी पोर्टलवर सविस्तर ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत .

Leave a Comment