काही मुलींना दाढी व मिशा कशामुळे येतात ? जाणू घ्या सविस्तर कारणे !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी – नियतिच्या नियमानुसार , पुरषांना दाढी व मिश्या येतात , जर पुरुषांना दाढी व मिश्या न आल्यास चर्चेचा विषय होवून जातो . त्याप्रमाणे जर महिलांमध्ये जर दाढी व मिश्या आल्यास तो देखिल मोठा चर्चेचा विषय ठरुन जातो .याचे नेमके कारण कोणते आहेत , ते पुढीलप्रमाणे सविस्तर जाणून घेवूयात ..

मुलं ज्यावेळी ज्यावेळी 18 ते 21 वर्षांमध्ये वयात येत असतात , त्यावेळी पुरुषांमध्ये वेगवेगळे बदल घडून येतात , जसे कि आवाज घोगरा येणे , दाढी , मिशा येणे , त्याचप्रमाणे मुली ज्यावेळी वयात येतात , त्यावेळी त्यांच्यामध्ये देखिल अनेक ग्रंथी आणि हार्मोन्स वाढीमुळे केसांचे वाढ मोठ्या प्रमाणात होण्यास सुरुवात होते . परंतु तज्ञांच्या मते मुलींना दाढी व मिश्या येणे हा एक हार्मोन्स मधील विकास असू शकतो , जो कि महिलांना त्रासदायक ठरत असतो .

हा रोग पुर्वीपासून चालत आला आहे , प्राचीन काळांमध्ये या रोगास हर्सुटिझम असे संबोधले जात असत , याच हार्मोन्सचा अतिरिक्त वाढीमुळे मुलींना दाढी व मिश्या येतात . याशिवाय आनुवंशिक कारणांमुळे देखिल मुलींना दाढी , मिश्या येण्याचे कारण होवू शकते .

मुलींना दाढी व मिश्या येण्याचे प्रमुख कारण म्हणजे ज्यावेळी मुलींच्या शरीरांमध्ये पुरुष हार्मोन्सचे असंतुलित प्रमाणात वाढ होणे . हे पुरुष हार्मोन्स महिलांमध्ये चुकीच्या प्रकारची जीवनशैली तसेच चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणे अशा प्रकारच्या कृत्यांमुळे महिलांमध्ये पुरुषांचे हार्मोन्स वाढीमुळे दाढी व मिश्या येत असतात .

स्त्रीयांच्या डोक्यावर पुरुषांपेक्षा अधिक केसांचे प्रमाण असते , डोक्यावरील केस हे महिलांचे आभूषण मानले जाते . तर दाढी – मिश्यांमुळे पुरुष अधिक उठून दिसतात , आजही ग्रामीण भागांमध्ये पुरुष मंडळी हे मोठी दाढी व मिशी ठेवतात , तर हिंदु संस्कृतीमध्ये पुरुषांच्या मिशीला मोठे महत्व आहेत .

Leave a Comment