@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ feb. month payment update paripatrak ] : माहे फेब्रुवारी – 2025 वेतन देयके अदा करणेबाबत , जिल्हा सांख्यिकी कार्यालय ( अर्थ व सांख्यिकी कार्यालय ) मार्फत आहरण व संवितरण अधिकारी (सर्व ) यांच्या प्रति दि.27.01.2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेला आहे .
सदरच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , नियमित आस्थापनेवरील कर्मचारी व नियमितेतर आस्थापने वरील कर्मचारी यांमध्ये कार्यव्ययी आस्थापनेवरील , रोजंदारीवरील , अंशकालीन , मानसेवी इ. तसेच तदर्थ तत्वावर नेमणूका करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व कर्मचाऱ्यांची दिनांक 01 जुलै 2024 हा संदर्भ दिनांक निश्चित करुन माहिती शासनांच्या संकेतस्थळावर माहे नोव्हेंबर / डिसेंबर 2024 च्या वेतनासोबत पहिले प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यात आले आहेत .
तर आता पहिले प्रमाणपत्र वैध झाल्यानंतर दुसरे प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . याकरीता ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या Invalid Data Tab खाली कोणतीही त्रुटी सॉफटवेअर मध्ये दर्शविलेली नसेल , त्यांनी देखिल सदर कार्यालयांकडून माहिती अचूक असल्याबाबत , प्रमाणपत्र – 2 प्राप्त करुन घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी – 2025 ( February 2025 Paid in March 2025 ) च्या वेतन देयकासोबत जोडून वेतन देयक कोषागारात सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी 2025 च्या वेतन देयकास जोडले नसल्यास , कोणत्याही कार्यालयाचे वेतन देयके कोषागार कार्यालय / उप कोषागारे यांच्याकडून स्विकारण्यात येणार नाहीत अथवा पारित करण्यात येणार नाहीत , असे नमुद करण्यात आलेले आहेत .
तसेच दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याचा अंतिम दिनांक 28.02.2025 असा आहे . तरी दिनांक 28 फेब्रुवारी 2025 पुर्वीच सदर कार्यालयांकडून दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !