@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ farmer E-pik pahani nondani ] : राज्यातील शेतकऱ्यांना दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत ई-पिक पाहणी या ॲप्सवर नोंदणी करण्याची मुदत देण्यात आलेली आहे .
ई – पाहणी हे ॲप्स राज्य शासनांकडून लाँच करण्यात आलेले आहेत , सदर ॲप्समध्ये खास करुन शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आला असून , यांमध्ये शेती पिकांची माहिती तसेच शेतातील कायम पड , झाडांची तसेच कुपनलिका , बोअर अशा सिंचनांच्या साधनांची माहिती अपलोड करु शकता .
यापुर्वी तलाठी यांच्याकडे प्रत्यक्ष शेतांमध्ये जावून शेतातील शेती पिकांची , झाडांची तसेच इतर सिंचन साधनांची नोंदणी केली जात होती . परंतु ॲप्सच्या माध्यमातुन शेतकरी स्वत : सदरच्या माहिती अपलोड करु शकतो . यामुळे शेतकऱ्यांना तलाठी यांच्याकडे जाण्याची अधिक आवश्यक भासत नाहीत .
सध्या आपणांस सातबारा घेण्यासाठी तलाठी यांच्याकडे जाण्याची आवश्यकता नाही , तर ऑनलाईन माध्यमातुन सातबारा काढू शकतो , याकरीता आपण ई- पाहणी या ॲप्सवर माहिती अपलोड करणे आवश्यक असणार आहेत . सदर ॲप्सवर अपलोड करण्यात आलेलीच माहिती डिजीटल ॲप्सवर दिसून येते .
याशिवाय सध्या राज्यातील मागील वर्षी खरीप हंगामांमध्ये सोयाबीन व कापसाचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप करीता ई-पीक पाहणी या ॲप्सच्या माहितीच्या अनुषंगाने देण्यात येणार आहेत . यामुळे सदर ॲप्सवर पिकांची माहिती न चुकता भरावते , सदर माहिती भरण्यासाठी दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे .
सदरचे मोबाईल ॲप्स असुन यांमध्ये आपल्या आठ अ उतारा , सर्व्हे नंबर , गट नंबरच्या सहाय्याने क्षेत्र निवडुन पिकांची व इतर माहिती अपलोड करु शकता , याकरीता प्ले स्टोअर मधून ई -पीक पाहणी हे ॲप्स डाऊनलोड करुन घ्यावेत ..
- शेअर मार्केटमध्ये तेजी कधी येणार ? जाणून घ्या मार्केट तज्ञ , मोतीवाल ओसवाल यांचे भविष्य !
- सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
- शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट ; मार्केट आणखीन घसरण्याचा अंदाज !
- राज्यात महायुती सरकार राबवित असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण नवीन योजना ; सत्तांतर झाल्यास बंद पडण्याची भीती ..
- पुढील 48 तासात राज्यातील “या” जिह्यात , वाऱ्यासह पावसाची शक्यता !