@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ farmer agri control room ] : शेतकऱ्यांच्या विविध अडचणी तसेच तक्रारींचे समाधार करण्यासाठी राज्य कृषी विभागांकडून नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे . तसेच सदर नियंत्रण कक्ष कृषी विभागांकडून कार्यान्वित देखिल करण्यात आलेली आहे .
राज्यातील शेतकरी तसेच वितरक व विक्रेते यांना विभाग स्तरावर येणाऱ्या विविध अडचणी , तक्रारी यांच्या निवारण करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार विभाग पातळीवर नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आलेले आहेत . सदर नियंत्रण कक्षाला Whatsapp माध्यमातुन 9822446655 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर व्हॉट्सॲप क्रमांकावर केवळ संदेश पाठविण्याची सुविधा आहे , यावर कॉलिंग सुविधा देण्यात आलेली नाही . यामुळे शेतकऱ्यांनी सदर क्रमांकावर आपल्या अडचणी बाबत संदेश पाठवायचे आहेत . जर आपणांस कॉलिंगच्या माध्यमातुन अडचणीचे समाधान हवे असल्यास , 18002334000 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधायचा आहे . तसेच ई-मेलच्या माध्यमातुन तक्रार – अडचणी नोंदवायच्या असतील तर controlroom.qc.maharashtra@gmail.com या मेलवर संदेश पाठवायचे आहेत .
सदर वरीलप्रमाणे व्हॉट्सॲप , ई-मेल , टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधताना आपल्या अडचणी , किंमत , साठेबाजी , लिंकिंग तसेच निविष्ठांची गुणवत्ता , याबाबतच्या तक्रारी , अडचणी नोंदविताना आपले नाव , संपर्क क्रमांक , पत्ता याबाबचे तपशिल नमुद करण्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .तसेच एका कोऱ्या कागदावर अडचणीची माहिती तसेच त्याबाबतचे फोटो लिहुन ते ई-मेल , व्हॉट्सॲप क्रमांकर पाठवण्यात यावेत , जेणेकरुन तक्रारींचे / अडचणींचे समाधान करणे सोयीस्कर होईल असे नमुद करण्यात आलेले आहेत .
तक्रारीसाठी कालावधी : वरील पैकी आपणांस तोंडी प्रकारच्या तक्रारी / अडचणी टोलफ्री नंबरवर संपर्क साधायचा असल्यास , आपणांस दिनांक 30.09.2024 पर्यंत सकाळी 08 ते रात्री 08 वोजेपर्यंत संपर्क साधता येईल .
-
सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee extra pay bonus and mahagai Bhatta ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचे अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकुण सॅलरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे . सदरचा 40 दिवस बोनस चा लाभ सैन्य दलातील अधिकारी /…