10 वी बोर्ड परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना ग्रेस मार्कसाठी , प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ !

Spread the love

@marathiprasar पवार प्रतिनिधी [ Extension of deadline for submission of proposals for grace marks for students appearing for 10th board exams ] : माहे फेब्रुवारी – मार्च 2025 मधील माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना चित्रकला , शास्त्रीय कला तसेच लोककलाचे अतिरिक्त गुण मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदवाढ देण्यात आलेली आहे .

चित्रकला , शास्त्रीय कला तसेच लोककला क्षेत्रांमध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणवाढीसाठी दिनांक 15 जानेवारी पर्यंत पर्यंत प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत होती , तर सदर मुदत वाढ करण्यात आलेली आहे .

शासकीय रेखाकला परीक्षा 2024 चा निकाल जानेवारी 2025 च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार असल्याने , सदर प्रस्तावास मुदतवाढ देण्यात आलेली आहे . सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे  जाणून घेवूयात ..

यांमध्ये विद्यार्थ्यांनी शाळेकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक 15.12.2024 अशी होती , तर आता सुधारित वेळापत्रकानुसार अंतिम दिनांक 24 जानेवारी 2025 अशी असून , शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम दिनांक 15 जानेवारी होती , तर सुधारित वेळापत्रकानुसार 31 जानेवारी 2025 अशी करण्यात आलेली आहे .

सदर प्रस्ताव विहीत काळात सादर करण्याचे सुचित करण्यात आले आहेत , जेणेकरुन विद्यार्थ्यांना सदर गुणांच्या सवलतीपासुन वंचित राहणार नाहीत , असे नमुद करण्यात आले आहेत .

Leave a Comment