कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदलांसाठी सुधारित धोरण संदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक दि.10.12.2024

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ employee transfer paripatrak] : कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदलांसाठी सुधारित धोरण निश्चित केल्याने , अवघड क्षेत्र घोषित करण्यासाठी माहिती सादर करणे संदर्भात , शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक मार्फत दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक गट विकास अधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी सर्व यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आली आहे.

सदर परिपत्रकाला ग्रामविकास विभागाचा दिनांक 18 जून 2024 रोजीचा शासन निर्णय व कार्यासन अधिकारी ग्रामविकास विभाग यांच्या दिनांक 07 नोव्हेंबर 2024 रोजीच्या पत्रानुसार सदर परिपत्रक सादर करण्यात आलेली आहे .

सदरच्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की , जिल्हा परिषदेच्या कार्यरत शिक्षक संवर्गाच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांचे सुधारित धोरण निश्चित करण्यात आले असून , जिल्हा परिषदेतील कार्यरत शिक्षक संवर्गाच्या बदल्यांचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे . त्यानुसार जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे .

सदर अवघड क्षेत्रातील येणाऱ्या शाळांची यादी (School list) मुख्य कार्यकारी अधिकारी  (CEO) यांना सादर करावयाची आहे . याकरिता अवघड क्षेत्राचे निकष / बाबींची निकषांची पूर्तता होईल , अशा शाळांची/ गावांची अवघड क्षेत्राच्या यादीत समावेश करण्यासाठी विहित प्रपत्रात माहिती विहित कालावधीत हार्ड व सॉफ्ट कॉपीमध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे .

याकरिता समितीचे गठन करण्यात आले असून , गटविकास अधिकारी हे सदर समितीचे अध्यक्ष तर इतर चार सदस्य असे एकूण पाच जणांची समिती गठित करण्यात आलेली आहे . सदर समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना अहवाल सादर करायचे आहेत .

Leave a Comment