@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Detailed leave rules regarding half-pay leave, converted leave, unearned leave, extraordinary leave ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा काळात दिल्या जाणाऱ्या अर्धवेतन रजा , परिवर्तित रजा , अनर्जित रजा , असाधारण रजा संदर्भातील सविस्तर रजा नियम या लेखांमध्ये सविस्तर जाणून घेवूयात ..
अर्धवेतन रजा : सरकारी कर्मचाऱ्यास त्याने सेवेच्या पुर्ण केलेल्या प्रत्येक वर्षासाठी 20 दिवसांची अर्धवेतन रजा मिळण्याचा हक्क असतो , सदरची रजा ही वैद्यकीय प्रमाणपत्रांवर आधारित खाजगी कामानिमित्त घेता येते . कर्मचारी आणखी सेवा करण्यास पुर्णपणे व कायमचा असमर्थ झाला असेल तर वैद्यकीय प्राधिकाऱ्याने घोषित केले असेल तर त्याला अर्धवेतन रजा मंजूर करता येते .
परिवर्तित रजा : कर्मचाऱ्यास त्याला देय असणाऱ्या रजेच्या निम्मे परिवर्तित रजा त्याच्या रजा संपल्यानंतर कामावर परत येण्याच्या शक्यतावर रजा मंजूर करता येते . तसेच परिवर्तित रजा मंजूर करण्यात येईल तेव्हा अशा रजेच्या दुप्पट दिवस देय अर्धवेतन रजेच्या खाती खर्ची टाकण्यात येते . सदर रजा लोकहितासाठी म्हणून प्रमाणित केलेल्या एखाद्या मान्यता प्राप्त पुर्णकालिन अथवा अशंकालीन शिक्षक करीता व अंतिम परीक्षेची तयारी करीता कमाल 90 दिवस इतकी परिवर्तित रजा मंजूर करता येते .
अनर्जित रजा : निवृत्तीपुर्व रजा वगळता इतर बाबतीत कायम सेवेतील सरकारी कर्मचाऱ्याला अनर्जित रजा मंजूर करता येते , तर सदर रजा ही जेवढी अर्धवेतन रजा अर्जित होण्याची शक्यता असेल त्या मर्यादेपर्यंत अनर्जित रजा असावी असे नमुद आहे . तसेच सरकारी कर्मचारी रजा संपल्यानंतर कामावर परत रुजु होण्याची वाजवी शक्यता असेल तर सदर रजा मंजूर करण्यात येते .
त्याच्या संपुर्ण सेवा काळात अनर्जित रजा कमाल 360 दिवसार्पंत मर्यादित असावी , तर यापैकी वैद्यकीय प्रमाणपत्राखेरीज अन्य कारणास्तव एकावेळी जास्तीत जास्त 90 दिवस व सर्व मिळून जास्तीत जास्त 180 दिवस इतकी रजा असू शकेल , असे नमुद करण्यात आले आहेत .
असाधारण रजा : सरकारी कर्मचाऱ्याला अन्य कोणतीही रजा अनुज्ञेय नसेल किंवा अन्य कोणतीही रजा अनुज्ञेय नसेल तेंव्हा अन्य रजा अनुज्ञेय असेल परंतु शासकीय कम्रचारी त्याला असाधारण रजा मंजूर करण्यात यावी असा लेखी अर्ज करेल तेंव्हा सदर रजा मंजूर करता येते . सदरची रजा ही सेवा काळानुसार मंजूर करता येते , म्हणजे 03 वर्षे सतत सेवा पुर्ण असेल तर 06 महिने असाधारण रजा मंजूर करता येते , तर 05 वर्षे सतत सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना 12 महिने तर अन्य कारणांवरुन असाधारण रजा मंजूर करता येते .
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025
- आता जादा कामासाठी या शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुधारित मानधन ; GR निर्गमित दि.21.03.2025
- मार्च पेड इन एप्रिल वेतन देयक अदा करणेबाबत निधीचे वितरण ; शासन निर्णय निर्गमित दि.20.03.2025
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम अदा करणेबाबत परिपत्रक दि.11.03.2025