माहे एप्रिल महिन्यात सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना 56 टक्के दराने डी.ए वाढ मिळणार ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !

Spread the love

@marathiprasar वैशाली पवार प्रतिनिधी [ Decision on dearness allowance hike for January 2025 to be taken next week. ] : सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी मोठी आनंदाची न्युज समोर आली आहे , ती म्हणजे डी.ए वाढीचा कॅबिनेट निर्णय पुढील आठवड्यापर्यंत होण्याची शक्यता आहे .

प्राप्त माहितीनुसार येत्या 19 एप्रिल रोजी केंद्रीय कॅबिनेट बैठक आयोजित करण्यात आली आहे , सदर बैठक देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून , यांमध्ये विविध विभागातील प्रलंबित प्रश्नावर चर्चाअंती निर्णय घेतले जाणार आहेत , यामध्ये वित्त विभाग मार्फत डी.ए वाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे .

केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2025 पासुन डी.ए वाढ नियोजित आहे , सदर डी.ए वाढ दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेर पर्यंत निर्णय घेतला जातो , परंतु केंद्र सरकारने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही . यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी दिसून येत आहे .

03 टक्के डी.ए वाढ निश्चित : ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे केंद्रीय कर्मचारी व पेन्शन धारकांना माहे जानेवारी 2025 पासुन 03 टक्के महागाई भत्ताची वाढीची शक्यता आहे . यानुसार एकुण महागाई भत्ता हा 53 टक्के वरुन 56 टक्के इतका होईल .

डी.ए थकबाकीसह / वाढीव डी.ए चा लाभ एप्रिल महिन्याच्या वेतनासोबत : सदर डी.ए वाढीचा निर्णय हा पुढील महीन्यात घेतला जाणार असल्याने माहे एप्रिल पेड इन मे महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत सदर वाढीव डी.ए माहे जानेवारी 2025 पासुन डी.ए थकबाकीसह अदा करण्यात येईल .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment