@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important notice regarding intra-district and inter-district transfers; Circular issued on 28.03.2025 ] : जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत ग्रामविकास विभाग मार्फत दिनांक 28 मार्च 2025 रोजी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रति शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे . सदर शासन परिपत्रकानुसार जिल्ह्यांतर्गत व आंतरजिल्हा बदल्याबाबत महत्वपुर्ण सुचना दिले असून , सविस्तर सुचना पुढीलप्रमाणे पाहूयात ..
जिल्हांतर्गत बदली : जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 2025 करीता जे शिक्षक दिनांक 30 जुन 2025 रोजी वयाचे 53 वर्षे पुर्ण करीत असतील , अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग – 1 अंतर्गत पात्र ठरविण्यात यावेत , तसेच सर्व जिल्हा परिषदांनी विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची कार्यवाही जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदलीपुर्वी तातडीने पुर्ण करावे असे नमुद करण्यात आले आहेत .
सन 2022 मध्ये ज्या शाळा अवघड क्षेत्रामधून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत , अशा शाळांमधील 03 वर्षे सलग सेवा पुर्ण केलेल्या ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची विनंती अर्ज करुनही सन 2022-23 मध्ये बदली झाली नव्हती , अशा शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या दिनांक 18.06.2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सन 2025 च्या जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून एक विशेष बाब म्हणून संधी द्यावी असे नमुद करण्यात आले आहेत .
अवघड क्षेत्रातील रिक्त पदे हे भरण्याबाबत टप्पा क्र.07 राबविण्यात यावा असे नमुद करण्यात आले असून , त्यापुर्वी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागा निश्चित करताना समानीकरण करीता रिक्त ठेवावयाची पदे विहीत तत्वानुसार निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत .
हे पण वाचा : गट क व ड संवर्गातील 620 रिक्त जागेसाठी महाभरती !
त्याचबरोबर पुढील बदली वर्षामध्ये निवृत्त होत असणाऱ्या शिक्षकांनी विनंती केली असल्यास अशा शिक्षकांना विशेष संवर्गा 01 मधून बदलीपात्र ठरविण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .
आंतरजिल्हा बदली : शैक्षणिक वर्ष सन 2025 करीता शिक्षक पदभरती होणार असल्यामुळे विभागाच्या दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजीच्या पत्रानुसार , सुचित केल्याप्रमाणे दिनांक 23 मे 2023 रोजीच्या शासन निर्णयात नमुद केल्यानुसार आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातुन बाहेर जाण्याकरीता रिक्त पदांची टक्केवारी 10 टक्के पेक्षा कमी असणे आवश्यक आहे , सदर अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सन 2024-25 करीता शिथील करण्यात येत असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच आंतरजिल्हा बदलीकरीता दिनांक 30 सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आलेल्या पटसंख्येच्या आधारावर मिळालेल्या संचमान्यतेनुसार , बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शविण्यात यावेत , तसेच सदर संचमान्यतेनुसार ज्या जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक अतिरिक्त असतील , अशा जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदेतील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली अनुज्ञेय असणार नाही , असे नमुद करण्यात आले आहेत .


- दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 08 महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय !
- कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल पेड इन मे वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.22.04.2025
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.22 एप्रिल रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 21 एप्रिल रोजी निर्गमित झाले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांचे एप्रिल 2025 चे वेतनासाठी करावे लागणार हे काम ; वित्त विभाग मार्फत GR निर्गमित !