पिक विमा योजना अंतर्गत पिकाची नुकसान झाले असल्यास 72 तासांमध्ये तक्रार नोंदविण्याची सुविधा !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ crop insurance complaint apps] : पिक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांचे पिकांची नुकसान झाले असल्यास , सदर नुकसान भरपाई करिता तक्रार 72 तासांत ऑनलाइन ॲप्स च्या माध्यमातून नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे , सदर ॲप्सच्या माध्यमातून ऑनलाईन तक्रार 72 तासात प्रत्यक्ष शेतकऱ्यांना नोंदविता येणार आहे .

सध्या राज्यामध्ये अतिवृष्टी तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे . याकरिता राज्य शासनाकडून पंचनामे करण्याची आदेश प्रशासनास दिले असून , नुकसान झाल्यास आता शेतकऱ्यांना देखील मोबाईलच्या माध्यमातून तक्रार प्रशासनाकडे नोंदविता येणार आहे . तक्रार नोंदवल्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे केली जाईल व नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाईल .

याकरिता शेतकऱ्यांनी प्लेस्टोरच्या (Play Store ) माध्यमातून क्रोप इन्शुरन्स ( Crop Insurance ) हे ॲप्स डाऊनलोड करून त्या माध्यमातून पीक नुकसान (  क्रॉप लॉस ) या पर्यायचा निवड करून, त्यामध्ये मोबाईल नंबर टाकून ओटीपी टाकावा . त्यामध्ये खरीप हंगाम , वर्ष 2024  योजना आणि राज्य निवडून त्यामध्ये नोंदणीचा स्त्रोत सीएससी ( CSC ) अशा प्रकारे निवड करून आपल्याकडील पॉलिसी नंबर आहे का ,  त्या ऑप्शन समोरील बटन क्लिक करावे . आणि विमा पावती क्रमांक टाकून डन ( Done ) करावे , त्यामध्ये आपले पावती नंबरचा तपशील दिसेल .

त्यामध्ये घटक क्रमांकामधील पिकांची तक्रार करायची आहे अशा प्रकारचा ऑप्शन निवडावा त्यामध्ये घटनेचा प्रकार इत्यादी तपशील निवडून बाधित पिकांचा फोटो सबमिट करावा . त्यानंतर आपली तक्रार यशस्वीरित्या प्रशासनाकडे दाखल होईल याची तक्रार आयडी जतन करून ठेवावे.

Leave a Comment