@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : राष्ट्रीय काँग्रेस पक्षांकडून पहिल्या टप्यांमध्ये 57 जणांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे , यांमध्ये महाराष्ट्र राज्यात 7 उमेदवारांचा समावेश आहे , येत्या 19 एप्रिलपासुन मतदान प्रक्रिया सुरु होत असल्याने , मतदारांना उमेदवार कोण आहे , हे माहित असणे आवश्यक असल्याने सर्व पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहेत .
राज्यात महाविकास आघाडी व महायुती सरकारकडून आपापले उमेदवार घोषित करण्यात येत आहेत . आता राष्ट्रीय काँग्रेस पक्षांकडून पहिल्या टप्यांमध्ये घोषित करण्यात आलेल्या उमेदवारीमध्ये देशात एकुण 57 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे . यांमध्ये महाराष्ट्र राज्यासह , गुजरात , कर्नाटक , राजस्थान , तेलंगणा , पश्चिम बंगाल आणि पदुचेरी या राज्यातील उमेदवारांची यादी काँग्रेस पक्षांकडून जाहीर करण्यात आलेली आहे .
राज्यांनुसार पहिल्या टप्यात घोषित करण्यात आलेल्या उमेदवारांची संख्या :
अ.क्र | राज्य / प्रदेश | जाहीर उमेदवारांची संख्या |
01. | महाराष्ट्र | 07 |
02. | गुजरात | 11 |
03. | राजस्थान | 05 |
04. | तेलंगणा | 05 |
05. | पश्चिम बंगाल | 08 |
06. | पदुचेरी | 02 |
07. | कर्नाटक | 17 |
महाराष्ट्र राज्यातील 7 उमेदवारांची यादी ;
महाराष्ट्र राज्यातील 7 उमेदवारांची लोकसभा निवडणुका 2024 साठी पहील्या टप्यात घोषणा करण्यात आलेली असून कोल्हापुर मतदार संघ मधून छत्रपती शाहू महाराज , सोलापूर मतदार संघातुन प्रणिती शिंदे , नंदुरबार मतदार संघातुन गोडवी , पुणे मतदार संघातुन रविंद्र धंगेकर , अमरावती मतदार संघातुन बळवंत वानखेडे , नांदेड मतदार संघातुन वसंतराव चव्हाण तर लातुर मतदार संघातुन शिवाजीराव काळगे या 07 जणांची उमेदारी पहिल्या टप्यात जाहीर करण्यात आलेली आहे .