@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojna money transfer to labharthi account ] : लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये आर्थिक लाभ थेट बँक खात्यात हस्तांतरण करण्यात आले आहे . यामध्ये राज्यातील तब्बल 48 लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे हस्तांतरण करण्यात आले आहेत , आतापर्यंत राज्यातील तब्बल 80 लाख पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये सदर योजना अंतर्गत पैसे हस्तांतरण करण्यात आली आहेत .
राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये यापूर्वीच तब्बल 36 लाख पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरण करण्यात आले आहेत . आज दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त 48 लाख पात्र महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले . यामुळे राज्यातील महिलांना सदर लाडकी बहीण योजना अंतर्गत मोठा आर्थिक दिलासा प्राप्त झाला आहे .
सदर योजना अंतर्गत ऑनलाइन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 अशी आहे , यामुळे सदर योजना अंतर्गत ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळाले नाहीत . अशांनी आपल्या अर्जाची स्थिती तपासून घ्यावी जे त्रुटी असतील , त्या त्रुटींची पूर्तता करून अर्ज सबमिट करावे . ज्यामुळे आपणास लवकरच सदर योजना अंतर्गत पैसे बँक खात्यामध्ये मिळतील. यामुळे आपल्या जवळच्या सेतू सुविधा केंद्र अथवा आपल्या गावातील अंगणवाडी सेविका , आशा सेविका , ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून आपल्या अर्जाची स्थिती जाणून घ्यावी .
सदर पैसे आपले आधार कार्ड ज्या बँकेशी लिंक आहेत , अशाच बँक खात्यामध्ये पैसे हस्तांतरण करण्यात आली आहे . त्यामुळे अर्ज भरतेवेळी जे पासबुक दिले आहे , ते पासबुक ग्राह्य न धरता आधार कार्डशी जे खाते लिंक आहे , अशाच खात्यावर पैसे हस्तांतरण करण्यात आली आहे याची खात्री करून घ्यावी.
आतापर्यंत ज्या महिलांचे कागदपत्र अभावी अर्ज सादर करणे बाकी आहे , अशा महिलांनी 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन / ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत . जेणेकरून लवकर आपल्या बँक खात्यामध्ये सदर योजना अंतर्गत लाभ सुरळीत चालू राहील .
-
सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee extra pay bonus and mahagai Bhatta ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचे अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकुण सॅलरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे . सदरचा 40 दिवस बोनस चा लाभ सैन्य दलातील अधिकारी /…