@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Class 10th and 12th board exam result 2025 date has been decided ] : मागिल महिन्यांपासुन सुरु झालेल्या इयत्ता 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षाच्या निकालाची तारीख निश्चित झालेली आहे . यामुळे निकालाची उत्सुकता लागलेल्या विद्यार्थी व पालकांसाठी ही महत्वपुर्ण बातमी ठरणार आहे .
इयत्ता 12 वीचे सर्व पेपर आता संपले असून , इयत्ता 10 वी चे काही पेपर अजुन शिल्लक आहेत . मार्च अखेर इयत्ता 10 वी चे पेपर संपणार आहेत . इयत्ता 12 वीच्या सर्व विषयांच्या परीक्षा झाल्याने शिक्षकांकडून पेपर तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहेत .
निकाल कधी लागणार ? : मंडळाकडून प्राप्त माहीतीनुसार , उत्तर पत्रिका तपासणीचे काम हे प्रगती पथावर सुरु असून येत्या 15 मे पुर्वी निकाल जाहीर करण्यावर मंडळाचा भर राहणार आहेत . ज्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमाला प्रवेशाकरीता बऱ्याच वेळ मिळणार आहे .
नेहमीपेक्षा यंदाच्या वर्षी दोन्ही इयत्तेच्या परीक्षा ह्या दहा दिवस अगोदरच सुरु झाल्या आहेत , यामुळेच निकाल हे 10 दिवस अगोदर लागण्याचा मानस बोर्डाचा राहणार असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आला आहे .
यंदाच्या वर्षी तब्बल 31 लाख विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 वी व 12 वी ची बोर्ड परीक्षा दिली आहे . या विद्यार्थ्यांना आता पुढील शिक्षणासाठी निकालाचा उत्सुकता लागली आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !