@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big update for crores of NPS holders in the country; NMOPS organization prepares for historic sit-in protest. ] : देशातील करोडो एनपीएस धारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे ,ती म्हणजे NMOPS या देशातील कर्मचारी संघटना मार्फत देश पातळीवर जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी पुन्हा एकदा ऐतिहासिक धरणे आंदोलनाची तयारी केली जात आहे .
जुनी पेन्शन योजना : जुनी पेन्शन योजना या प्रमुख मागणीसाठी देशातील सर्व कर्मचारी एकत्र येवून लढा देत आहेत . देशात एकसंघ पद्धतीने आंदोलन करण्यासाठी , NMOPS या संघटनेच्या एकाच छताखाली जुनी पेन्शनची मागणी पुर्ण करण्यासाठी देशातील सर्व संघटना एकत्र आल्या आहेत .
NMOPS : National Movement for Old Pension Scheme या संघटनेचे नेतृत्व विजय कुमार बंधुजी हे करत आहेत . त्यांच्या अध्यक्षेखाली जुनी पेन्शनच्या मागणीसाठी देशपातळीवर वेळोवेळी आंदोलन करण्यात येत आहेत . त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्व सरकारी कर्मचारी एका छताखाली येवून आपली जुनी पेन्शनची मागणी करत आहेत .
यापुर्वी केलेल्या महा-आंदोजनामुळे केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये बदल करुन सुधारित पेन्शन प्रणाली म्हणजेच एकीकृत पेन्शन योजना लागु करण्यात आलेली आहे . आता लढा पुन्हा सक्रिय करुन जुनी पेन्शनची मागणी पुर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल केली जात आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र ( नागपुर ) येथे 12 वी पात्रताधारकांसाठी पदभरती 2025
01 मे रोजी महा-धरणे आंदोलन : दिनांक 01 मे 2025 रोजी देश पातळीवर जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी दिल्ली येथील जंतर-मंतर या ठिकाणी महा-धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहेत . तर याकरीता देशातील सर्व कर्मचाऱ्यांनी सदर महा- आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान संघटनेचे पदाधिकारी विजय कुमार बंधुजी यांनी केले आहेत .
सदर आंदोलनास राज्यातील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत पाठिंबा देण्यात आला असून , राज्यातील संजय सोनार ( मामा ) हे राज्यातील कर्मचाऱ्यांचे नेतृत्वासाठी पुढाकार घेत आहेत .
सदर आंदोलनास देशातील तब्बल 1 करोड पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने , तश्या प्रकारचे आयोजन संघटनेकडून करण्यात येत आहेत .
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
- 01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !
- सरकारी / निमसरकारी / महामंडळे मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेवू शकतो का ?
- दिनांक 25 ते 28 जुन दरम्यान पाऊसमान अंदाज : जाणून घ्या सविस्तर !
- सरळसेवा पदभरती प्रक्रिया मध्ये किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय ! जाणून घ्या सविस्तर परिपत्रक !