आयुष्यात अशा प्रकारे पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करुन ; व्हा करोडपती !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपल्याला आयुष्यात खरेच योग्य मार्गाने पैशांची गुंतवणुक करायची असल्यास , पैसा नेमका कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करावा , व कशा पद्धतीने करावा याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

सोन्यामध्ये करावा दिर्घ कालावधीसाठी गुंवणुक : आपण जर सोन्याच्या भाव पाहिले असता , सन 2001 मध्ये सोन्याचे सर्वसाधारण भाव हे 2001 ऐवढे होते . तर सन 2011 मध्ये सोन्याचे भाव हे 26400/- रुपये ऐवढे होते . तर सन 2021 सालाचा विचार केला असता सोन्याचे सर्वसाधारण दर हे 48,500/- रुपये ऐवढे होते . म्हणजेच सोन्याच्या भावातील वाढ ही झपाट्याने होत असताना दिसून येत आहे . आजचे सोन्याचे दर पाहिले असता 72,800/- रुपये इतका आहे .यामुळे म्हणजेच सोन्याच्या भावांमध्ये होणारी वाढ ही मोठ्या प्रमाणात होते .

आपणांस सोने प्रत्यक्ष खरेदी करण्याची नसल्यास आजकाल गोल्ड बॉन्ड अस्थित्वात आलेले आहेत , ज्यांमध्ये आपणांस बँका गोल्ड बॉन्ड खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते , ज्यांमध्ये सोन्याच्या वाढत्या किंमतीसह , आपणांस 03 ते 5 टक्के पर्यंत व्याज देखिल दिले जाते , यामुळे गोल्ड बॉन्ड खरेदी केल्याचे दुहेरी फायदा आपणांस मिळेल .

चांगल्या कंपनीच्या शेअर मध्ये करावी गुंतवणुक : आपण जर एखाद्या चांगल्या कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक केल्यास दिवसेंदिवस वाढत्या महागाई नुसार आपल्या शेअरची किंमत वाढत जाणार असून , आपणांस अधिक फायदा तसेच वार्षिक / त्रेमासिक पद्धतीने मिळणारा लाभांश देखिल वेगळा असेल . यामुळे आपण एखाद्या चांगल्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास आपणांस लाँग टर्म मध्ये मोठा फायदा होईल . यांमध्ये रिलायन्स , टाटा , जिओ , अडानी , आदित्य बिर्ला अशा चांगल्या फायदेशिर कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक केल्यास आपणांस निश्चित मोठा फायदा होईल .

म्युच्युअल फंडातील गुंतवणुक : आपण जर शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्याची मानसिकता / जोखित घ्यावी वाटत नसेल तर , आपण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुक करावी , ज्यांमध्ये आपणांस मासिक ( SIP ) अथवा वन टाईम पद्धतीने गुंवणूक  करता येईल . मासिक पद्धतीने गुंतवणुक करत गेल्यास आपणांस लाँग टर्म मध्ये फंडातील युनिटची किंमतीमधील वाढीनुसार , गुंतवणुक दारांस फायदा होईल .

मुदत ठेव ( FD ) / विविध शासकीय योजना : आपण जर वरील पैकी कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करण्यास जोखीम इच्छित नसाल तर , मुदत ठेव अथवा विविध शासकीय योजना मध्ये गुंतवणूक करावी . यामध्ये पोस्टाची PLI , अटल पेन्शन योजना तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची बचत योजना , तसेच पी.एफ या योजनांमध्ये गुंवणूक करावी . तसेच मुदत ठेव ( FD ) मध्ये देखिल गुंतवणुक केल्यास आपणांस मोठा फायदा होईल .

थोडक्यात आपण जर शेअर मार्केट मध्ये योग्य गुंतवणुक , तसेच म्युच्युअल फंडातील सातत्यपुर्ण गुंतवणूक , गोल्ड बॉन्ड / प्रत्यक्ष सोने खरेदी अशा प्रकारच्या गुंवणूकीवर भविष्यात मोठा लाभदायक फायदा होईल . तर विविध योजना / मुदत ठेव मध्ये फिक्स पद्धतीने आर्थिक लाभ होतो , जो कि इतर वरील गुंतवणूकीपेक्षा कमी असतो ..

Leave a Comment