@marathiprasar वैशाली पवार प्रतिनिधी [ Appointment and recruitment rate of non-teaching staff in schools in the state fixed; GR issued on 04.04.2025 ] : राज्यातील मान्यताप्राप्त असणाऱ्या खाजगी अंशतः / पूर्णतः अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियुक्ती व पदभरतीचे प्रमाण निश्चित करणे , संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आले आहे .
सदर शासन निर्णय नुसार नमूद करण्यात आले आहे की , राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः तसेच पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मधील शिक्षकेत्तर कर्मचारी पदे अनुकंप नियुक्ती सह 100 टक्के नामनिर्देशनाने भरण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे .
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये कनिष्ठ लिपिक , पूर्णवेळ ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक हे तीन पदे भरण्यास मंजुरी देण्यात येत आहे . अटी व शर्तीमध्ये नमूद करण्यात आली आहे की , खाजगी मान्यताप्राप्त असणाऱ्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याबाबतची तरतूद विहित करण्यात आलेली आहे .
सदर तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असणार आहे , अशा सूचना माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार , देण्यात आले आहेत . सदर पदे 100% सरळ सेवेने भरताना यामध्ये अनुकंप नियुक्तीच्या मार्गाचा समावेश आहे , ही बाब विचारात घेणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : पुणे येथे लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी पदावर नियमित नियुक्तीने कार्यरत कर्मचारी अद्याप कार्यरत असण्याची शक्यता आहे , यापैकी काही कर्मचारी वरील नमूद पदावर पदोन्नतीने नियुक्ती होण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करीत असण्याची देखील शक्यता आहे . अशा परिस्थितीमध्ये प्रचलित पद्धतीनुसार सदर पदे 50% मर्यादित पद पदोन्नतीने भरणे आवश्यक असणार आहे .
त्याचबरोबर प्रस्ताव अंतर्गत पदे 100% सरळसेवेने भरण्याबाबतची बिंदू नामावली नोंदवही संबंधित प्राधिकार्याकडे प्रमाणित करून घेण्याकरिता सादर करतेवेळी चतुर्थश्रेणी संवर्गात कोणताही कर्मचारी कार्यरत नाही . अथवा कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपैकी कोणताही कर्मचारी पदोन्नती करिता आवश्यक पात्रता धारण करीत नाही . अथवा पात्रता धारण करणारा कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदोन्नतीसाठी इच्छुक नाही . अशा आशयाची प्रमाणपत्र यथास्थिती बिंदू नामावली नोंदवही सोबत सादर करणे आवश्यक असणार आहे .
या संदर्भातील निर्गमित सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरिता शासन निर्णय (GR)
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !