@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ anukanpa niyukti shasan nirnay new gr] : अनुकंपा तत्वावर नियुक्ती करणे संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण ( सुधारीत ) नवीन जीआर (GR ) निर्गमित झाला आहे .
अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा ( TET / CTET ) उत्तीर्ण होण्याच्या अनुषंगाने काही तरतुदी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयामध्ये तरतूद करण्यात येत आहेत .
यामध्ये दिनांक 20 जानेवारी 2016 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक तीन मधील शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी व केंद्र शासनाच्या केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा ( CTET ) या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्या सवलत राहील हा मजकूर सदर शासन निर्णयनुसार वगळण्यात येत आहेत .
त्याचबरोबर राज्य शासनाच्या दिनांक 13 फेब्रुवारी 2013 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा (TET ) अनिवार्य करण्यात आल्याने , दिनांक 20 जानेवारी 2016 रोजीच्या निर्णयानुसार अनुकंपा तत्वावरील प्राथमिक शिक्षक (Primary Teacher ) या पदावर नियुक्ती दिलेल्या , त्याचबरोबर वैयक्तिक मान्यता त्याचबरोबर शालार्थ आयडी देण्यात आले आहे . अशा शिक्षकांपैकी जे शिक्षक राज्य शासनाच्या आयोजित शिक्षक पात्रता ( टीईटी ) अथवा केंद्र शासनाच्या आयोजित शिक्षक पात्रता (CTET ) परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत , अशा शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा सदर शासन निर्णयाच्या दिनांका पासून पुढील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे , असे नमूद करण्यात आलेले आहेत .
त्याचबरोबर ग्रामविकास विभागाच्या दिनांक 11 ऑक्टोबर 2022 रोजीच्या पत्रानुसार , अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक ( Primary Teacher ) पदावर नियुक्ती करिता शिक्षक पात्रता परीक्षा अथवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET ) अनिवार्य करण्यात आलेली आहे . यामुळे ज्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत , अशांनी पुढील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये सदर टीईटी अथवा CTET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहेत .
जे शिक्षक पुढील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये सदर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत , अशा शिक्षक कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहेत .

- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !