शेतकऱ्यांना कोरफड शेतीचा उत्तम पर्याय ; जाणून घ्या कोरफड शेतीची लागवड , उत्पादन , उत्पन्न बाबत सविस्तर  .

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : कोरफड शेती हा देखिल शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे ,कोरफड शेती प्रामुख्याने औषध , फेशल क्रिम , आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी वापर केला जातो . या पिकाची लागवड केल्याच्या नंतर एकरी किती उत्पन्न होते , किती फायदा होतो , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

कोरफड हे नाशवंत असल्याने , कोरफडीच्या पानांची तोडणी केल्याच्या नंतर 72 तासांच्या आत प्रक्रिया होणाऱ्या उद्योगांसाठी पाठविणे आवश्यक असते . कोरफड पिकांची लागवड करण्यापुर्वी कोरफडीसाठी आवश्यक बाजारपेठ यांचा शोध घेणे आवश्यक असेल , कोरफडाच्या पानांपासुन बहुदा सौंदर्य उत्पादने बनविण्यासाठी वापर होतो , त्या पाठोपाठ औषधे तयार करण्यासाठी देखिल मोठ्या प्रमाणात वापर होत असतो .

सौंदर्य प्रधानांची मागणी सध्या बाजारांमध्ये वाढली असल्याने , कोरफडीला देखिल प्रचंड मागणी वाढत आहे . कोरफडीला भारतातच नव्हे तर विदेशांमध्ये देखिल मोठ्या प्रमाणात मागणी आहे . यामुळे या पिकांची लागवड करुन मोठा पैसा कमवला जावू शकतो .

कोरफड लागवडीचा खर्च व कमाई : आपण जर एका हेक्टर मध्ये कोरफडीची लागवड केल्यास , आपणांस 50,000/- रुपये इतका खर्च येईल , एकदा लागवड केल्यास तीन वर्षांपर्यंत या पिकाच्या पानांची कापणी केली जावू शकते . या पिकांच्या पानांची विक्रीसाठी थेट कंपन्यांसोबत संपर्क करु शकता , त्यातुन तुम्हाला प्रति हेक्टरी 4.5 लाख रुपये पर्यंत कमाई होईल . हे उत्पन्न लागवडीपासुन तीन वर्षापर्यंत होईल .

जर आपण कोरफडीवर प्रक्रिया करुन कोरफड जेल / रस बनवून विक्री केल्यास , आपल्यास प्रति वर्षी 8 लाख रुपये पर्यंत दर वर्षी लाभ होईल . कोरफड लागवडीसाठी कमी सुपिक जमी असली तरी चांगल्या प्रकारे पिकांची वाढ होते .यामुळे शेतकऱ्यांना काही तरी नाविन्य पुर्ण करायचे असल्यास , कोरफड लागवड करावेत .

Leave a Comment