@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ According to the new educational policy, 02 degrees at the same time after 12th. ] : आता इयत्ता 12 वी नंतर एकाच वेळी 02 पदव्या मिळणार आहेत . यामुळे विद्यार्थ्यांना चार वर्षात 02 पदव्या प्राप्त करु शकणार आहेत , या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने NCTE कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये सदर 02 पदव्यांची बाब नमुद आहे .यानुसार इयत्ता 12 वी नंतर पुढील 04 वर्षांमध्ये पदवी व बीएड ( इंटिग्रेटेड कोर्स ) अशा 02 पदव्या घेता येणार आहेत . सदर प्रस्ताव मंजुरी करीता नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनकडे सादर केलेला असून ..
पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजेच सन 2025-26 पासुन या धोरणानुसार 02 पदव्यांचे नियोजन सोलापुर विद्यापीठ मार्फत करण्यात येणार आहेत .म्हणजेच पुढील चार वर्षात पदवी सोबतच इंटिग्रेटेड कार्स जसे कि , बीए – बीएड , बीएस्सी – बीएड , बी.कॉम – बीएड असे अभ्यासक्रम सुरु करण्याच्या तयारीत विद्यापीठ आहे .
म्हणजेच विद्यार्थ्यांना पदवी सोबतच बीएडचेही शिक्षण घेता येणार आहेत . यांमध्ये सध्या तीन वर्षे पदवी व 02 वर्षे बीएड असे एकुण 05 वर्षे घालावे लागतात , परंतु आता नविन धोरणांनुसार 04 वर्षांमध्ये पदवी व बीएड करता येणार आहेत .
एनसीटीई मार्फत मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्यांदा 300 विद्यार्थ्यांना प्रवेश देवून सदर अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे . सदर अभ्यासक्रम हे व्यावसायिक शिक्षण करीता लागु राहणार नाही .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !